CM Eknath Shinde On G20 Summit 2023 Saam Tv
महाराष्ट्र

Saamana Editorial News: 'हा सरकार प्रायोजित करमणुकीचा कार्यक्रम...' G20 शिखर परिषदेवर 'सामना'तून टीका

Gangappa Pujari

Saamana Editorial News:

राजधानी नवी दिल्लीमध्ये जी २० परिषदेचे (G20 Summit) आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी जगभरातील नेते आणि विविध देशाचे प्रतिनिधी भारतात आले आहेत. मोठ्या भव्य- दिव्य पद्धतीने पार पडत असलेल्या या परिषदेचा आजचा दुसरा दिवस. एकीकडे G20 परिषदेची चर्चा होत असतानाच 'सामना'मधून या कार्यक्रमावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

'सामना' अग्रलेख

आपल्या देशात सध्या सरकार प्रायोजित करमणुकीचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. पंतप्रधान मोदीदेखील (PM Narendra Modi) लोकांची करमणूक चांगली करीत आहेत. 'जी-20' संमेलनानिमित्त दिल्ली सजविण्यात आली आहे. 20 देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत (Delhi) उतरले. या संमेलनाचे यजमानपद भारतास मिळाले. इतक्या देशांचे राष्ट्रप्रमुख राजधानीत येत असल्याने सामान्य जनतेसाठी दिल्लीचे रस्ते साफ बंद करून ठेवले.

विमान वाहतुकीवर निर्बंध आले. मेट्रो ट्रेनही बंद केल्या. लोकांचे व्यवहार, दळणवळण रोखले. इतर देशांतील अशा संमेलनास मी गेलो आहे. लोकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने असे सोहळे साजरे होत असतात, पण आपल्या देशात असे सोहळे म्हणजे जनतेला ताण. 'जी-20'साठी दिल्लीत 20 देशांचे राष्ट्रप्रमुख येत आहेत. त्यात अमेरिकेचे ज्यो बायडेन (Joe Biden) आहेत. चीन आणि रशियाचे राष्ट्रप्रमुख त्यात नाहीत.

त्यामुळे सोहळा थोडा फिका पडला. दिल्लीच्या वृत्तपत्रांत एक बातमी प्रसिद्ध झाली. परदेशी पाहुणे देशाच्या राजधानीत येत आहेत. दिल्लीतील गरिबी, बजबजपुरी, झोपडय़ा दिसू नयेत म्हणून अनेक असे भाग रंगतदार पडदे लावून झाकून ठेवले गेले. हे दारिद्रय़ गेल्या आठ-नऊ वर्षांत नष्ट करण्यात सरकारला अपयश आले. त्यामुळे झाकून ठेवण्याची वेळ आली.

दिल्लीत येणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना, पंतप्रधान मोदी यांना 'वन टू वन' भेटायची इच्छा आहे, पण मोदी स्वत: 'जी- 20' च्या आयोजनात व पाहुण्यांच्या सरबराईत इतके गुंतले की त्यांना खरोखरच 20 देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटण्यास वेळ नाही, असे वृत्त भाजप (BJP) गोटातून प्रसिद्ध झाले. ही करमणूकच आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: प्रेमासाठी काय पण..! बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं अन् कुलूप लावलं, लेकीचा प्रताप पाहून कुटुंबीय चक्रावले VIDEO

Malvan Statue Incident: मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेत मोठी कारवाई! उत्तर प्रदेशमधून तिसऱ्या आरोपीला अटक; पोलीस कोठडीत रवानगी

PM Kisan Yojana: बळीराजासाठी केंद्राची खास योजना! मिळतात ६ हजार रुपये; जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT