Rain Alert in Maharashtra : राज्यात आज कसा असेल पाऊस? पुण्यासह ६ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'

Rain Forecast in Maharashtra : हवामान विभागच्या अंदाजानुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे.
Rain
Rain SaamTv

Rain Update :

राज्यात मागील २-३ दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. तब्बल महिनाभर रुसलेला पाऊस सप्टेंबर महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी दाखल दाखल झालं. माना टाकलेल्या पिकांची नव्याने डोलायला सुरुवात केली आहे.

मागील महिना कोरडा गेल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे काही दिलासा मिळाला आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागच्या अंदाजानुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. (Latest Marathi News)

Rain
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींची हेळसांड; अंत्यसंस्कारासाठी नागरिकांचा नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून धोकादायक प्रवास

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या सहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा येथील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Rain
Mumbai Water Lake Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारे ४ तलाव काठोकाठ भरले; इतर तलावांत किती पाणीसाठा?

राज्यात सक्रीय झालेला पाऊस पुढील २-३ आठवडे कायम राहिल असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांना वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील रबी पिकाला नवी संजिवनी मिळाली आहे. शेतकऱ्यांना रबी हंगाम वाया जाण्याचा धोका टळू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com