uddhav thackeray And raj thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: दोन्ही ठाकरेंनी महायुतीत यावं, केंद्रीय मंत्र्यांची खुली ऑफर

Uddhav Thackeray And Raj Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. 'दोन्ही ठाकरेंनी महायुतीत यावं.', अशी खुली ऑफर त्यांनी दिली.

Priya More

Summary -

  1. महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत आहेत.

  2. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना महायुतीत सामील होण्याचे खुली ऑफर दिली.

  3. त्यांच्या एकत्र येण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

  4. भारत-पाकिस्तान सामन्यावरून शिवसेना-मनसेच्या आंदोलनावर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. गेल्या ३ महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ३ वेळा भेट होत चर्चा झाली आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू असून पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वजण सकारात्मक आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून सत्ताधारी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया दिली. 'दोन्ही ठाकरेंनी महायुतीत यावं', असं म्हणत त्यांनी दोन्ही ठाकरेंना खुली ऑफर दिली.

रामदास आठवले यांनी सांगितले की, 'दोन्ही ठाकरे यांनी महायुतीत यावं. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत गेले तर त्यांचे नुकसान होईल. हे दोघे एकत्र आले तर महाविकास आघाडीवर परिणाम होईल. राज ठाकरे यांच्या भूमिका मुंबईतील नागरिक स्वीकारणार नाहीत.उलट मुंबई महापालिका ही महायुतीकडे येईल.', असे स्पष्ट मत मांडत त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.

भारत-पाकिस्तान सामन्याला ठाकरे गट आणि मनसेने विरोध केला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी सांगितले की, 'भारत पाकिस्तान मॅच आहे. रात्री 8 वाजता मॅच सुरू होणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांना मोदी यांनी धडा शिकवला आहे. माझे कुंकू, माझा देश हे उद्धव ठाकरे यांचे आंदोलन सुरू झाले आहे. खेळात राजकारण आणू नये. मॅच होत असताना त्यात पाकिस्तान टीम खेळत आहे. सिस्टिमप्रमाणे ते खेळणार. संजय राऊत यांनी नको ते विषय करून समाजवाद करू नये. २०२९ ला पण मोदी पंतप्रधान होणार आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT