नाशिकमध्ये महायुतीविरोधात ठाकरेसेना आणि मनसेनं रणशिंग फुंकलंय.. तर राऊतांनी भरसभेत यापुढे मनसे आणि सेना एकत्र लढणार असल्याचे संकेतचं दिले...त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकीची वज्रमुठ आता सरकारविरोधात एकटवलेली पाहायला मिळतेय... नाशिकमध्ये दोन्ही पक्षाचे हजारो आंदोलक वाढत्या गुन्हेगारी विरोधात आणि पालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरले..
दरम्यान बाळा नांदगावकर हे संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी नाशिककरांच्या समस्य़ा मांडत सरकारला इशारा दिलाय.
दरम्यान नाशिकमधील मोर्चात दोन्ही पक्षांकडून कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले पाहूयात...
महापालिकेतील भ्रष्टचारी कारभारावर मोर्चातून टीका करण्यात आली. तसचं महायुती सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासनं देऊन दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला. त्याशिवाय वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री यावरही मोर्चातून सवाल उपस्थित करण्यात आला..
दरम्यान एकीकडे ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढत असताना दुसरीकडे दोन्ही पक्षातील नेते-कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मोर्चेबांधणी करतायत. त्यामुळे युतीच्या घोषणेआधीच ठाकरे बंधूंकडून महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यात नाशिकनंतर पुण्यातही मोर्चाचं आयोजन केलं जाणार असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंनी एकीची वज्रमुठ आवळलीय, हे निश्चित..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.