Rajya Sabha By Election 2024: Saam Tv
महाराष्ट्र

Rajya Sabha by Election: लोकसभेत पिछेहाट, राज्यसभेत सरशी! पोटनिवडणुकीत १० पैकी ८ जागा एनडीए जिंकणार? अशी आहेत समीकरणं

Rajya Sabha By Election 2024: लोकसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता ना आलेल्या महायुती तसेच एनडीए आघाडीला राज्यसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळणार आहे. राज्यसभेच्या १० पैकी ९ जागा एनडीकडे जाण्याची शक्यता आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. १५ जून २०२४

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. देशात ४०० पार आणि राज्यात ४५ प्लसचा नारा दिलेल्या महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. या धक्कादायक निकालामुळे लोकसभेत पिछेहाट झालेल्या महायुतीची राज्यसभा निवडणुकीत सरशी होणार आहे. कसं असेल राज्यसभा निवडणुकांचे समीकरण? जाणून घ्या सविस्तर..

राज्यसभेचे सदस्य असलेले सदस्य लोकसभेवर निवडून गेल्यानंतर 10 जागा झाल्या आहेत. रिक्त झालेल्या ज्या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याठिकाणी एनडीएचे सरकार आहे. तसेच रिक्त झालेल्या 10 जागांपैकी 7 जागा या भाजपाच्या आहेत, तर दोन जागा काँग्रेसच्या आणि 1 जागा आरजेडीची आहे.

या जागांमध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले पियुष गोयल आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश आहे. महाराष्ट्रात एनडीएचं बहुमत असल्यानं या दोनही जागेवर एनडीएचे उमेदवार निवडून येणार येणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसला या निवडणूकीत के सी वेणूगोपाल आणि दिपेंद्र हुड्डा यांच्या दोन जागा गमवाव्या लागणार आहेत.

केसी वेणुगोपाल हे राजस्थानहून राज्यसभेवर निवडून गेले आहेत, तर दिपेंद्र हुड्डा हरियाणातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. हरियाणा आणि राजस्थानमध्ये भाजपचं सरकार आहे. मात्र हरियाणाचं सरकार सध्या अपक्षाच्या पाठिंब्याने सत्तेत आहे.

दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीने भाजप सरकारचा पाठींबा काढून घेतल्याने भाजपसाठी ही जागा कठीण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूकीत एनडीएला 10 पैकी 8 ते 9 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT