Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाला दुसरा धक्का; माजी नगरसेविका शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

Maharashtra Politics Breaking News: ठाण्याची लोकसभेची जागा गेल्यानंतर ठाकरे गटामध्ये मोठी पडझड पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी माजी मंत्र्यांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे.
Maharashtra Politics Breaking News:
Maharashtra Politics Breaking News: Saamtv
Published On

मुंबई, ता. १५ जून २०२४

लोकसभा निवडणुकानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता ठाण्यामधून ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून मीरा भाईंदर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका व शहर अध्यक्ष तारा घरत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

एकीकडे आज आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेपुर्वी उद्धव ठाकरेंना ठाण्यात मोठा धक्का बसला असून मीरा भाईंदर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका व शहर अध्यक्ष तारा घरत यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत घरत यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आदी नेते यावेळी उपस्थित होते. विधानसभेपूर्वी ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Politics Breaking News:
Maharashtra Politics : लोकसभेत महायुतीला धोबीपछाड, आता विधानसभेसाठी काय रणनिती? आज 'मविआ'ची संयुक्त पत्रकार परिषद

दरम्यान, ठाण्याची लोकसभेची जागा गेल्यानंतर ठाकरे गटामध्ये मोठी पडझड पाहायला मिळत आहे. मीरा भाईंदर शहरात आणखी दोन माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक विश्वासू शिलेदार ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics Breaking News:
Shocking VIDEO : वाळू माफियांची दादागिरी! तलाठी, कोतवालला भररस्त्यात बेदम मारहाण; धक्कादायक घटनेने खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com