Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्यानं 'हाताची' साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

Maharashtra Political News : रायगडमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. रायगडचे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र प्रवीण ठाकूर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

Yash Shirke

  • रायगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

  • काँग्रेसचा मोठा नेत्याचा पक्षाला रामराम

  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

Maharashtra : राज्यामध्ये प्रत्येक पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तयारीला लागला आहे. निवडणुकांच्या आधी राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कालच काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आता आणखी एका बड्या नेत्याने काँग्रेसचा हात सोडला असल्याची माहिती समोर आली आहे.

रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र प्रवीण ठाकूर काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवीण ठाकूर हे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहेत. ते उद्या (२ जुलै) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे कोकणात काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

काँग्रेस पक्षात नाराज असल्याचे प्रवीण ठाकूर यांनी म्हटले आहे. 'माझ्या वडिलांवर अन्याय झाला आहे. पक्षातून जनतेचे प्रश्न सुटत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला', अशी माहिती प्रवीण ठाकूर यांनी दिली. यामुळे रायगडमधील उरल्या-सुरल्या काँग्रेस पक्षाला धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

'काँग्रेसमध्ये ३८ वर्ष काम केल्यानंतर माझ्या वडिलांना आमदारकीची उमेदवारी मिळाली पण त्यांच्यावर एका प्रकारचा अन्यायच झाला. काँग्रेसने रायगडमध्ये जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवले नसल्याने काँग्रेसमध्ये राहून काय उपयोग? म्हणूनच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचे ठरवले,' असे प्रवीण ठाकूर यांनी म्हटले आहे. काँग्रेसला राज्यात सलग धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. काल कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, उद्या प्रवीण ठाकूर राष्ट्रवादीत जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रणित मोरे-मालती चाहरच्या केमिस्ट्रीची चर्चा; 'Bigg Boss 19'च्या घरात नवीन लव्ह स्टोरी सुरू, पाहा VIDEO

Laxman Hake : "रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा"लक्ष्मण हाकेंची मागणी | VIDEO

Liver Disease: हातावरील बदल सांगतात लिव्हरची लक्षणे, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा

Pune Metro 3: पुणेकरांना नवीन वर्षात खुशखबर मिळणार; हिंजवडी मेट्रो लाइन होणार सुरु; तारीख आली समोर

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

SCROLL FOR NEXT