OBC leaders prepare for protest in Maharashtra after Manoj Jarange Patil’s Maratha reservation demand; Chhagan Bhujbal calls urgent meeting. saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आंदोलनानंतर OBCच्या आंदोलनालाही येणार धार; हाकेंनंतर सरकारमधील मंत्रीही मैदानात, तातडीनं बोलावली बैठक

OBC Agitation Chhagan Bhujbal Calls Meeting: मनोज जरांगे यांच्या या मागणीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता आहे. आता मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे.

Bharat Jadhav

  • मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केली.

  • लक्ष्मण हाके यांनी या मागणीला विरोध करून ओबीसी संघटना आक्रमक झाल्या.

  • छगन भुजबळ यांनी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी तातडीनं बैठक बोलावली.

सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्यांच्या या मागणीला अनेक आमदार, खासदारांनी पाठिंबा दिलाय. मनोज जरांगे यांच्या या मागणीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ सक्रिय झाले असून त्यांनी तातडीनं बैठक बोलावलीय.

मनोज जरांगे यांनी यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. जरांगे यांच्या मागणीला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध दर्शवला असून ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. राज्यभरात ओबीसी संघटना उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. नागपूरमध्ये साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलीय. तर जालना जिल्ह्यात येत्या १ सप्टेंबरपासून ओबीसी संघटना आपले उपोषण चालू करणार आहे.

जरांगेंनी 'चलो मुंबई'चा नारा दिल्यापासून ते आंदोलन सुरू होईपर्यंत छगन भुजबळ कुठेच दिसत नव्हते. दरम्यान जरांगे यांचे आंदोलन तीव्र झाल्यामुळे मात्र भुजबळ सक्रिय झालेत. मिळालेल्या माहितीनुसार भुजबळ यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलीय. छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना मुंबईत बोलावलंय. १ सप्टेंबर रोजी ओबीसी नेत्यांनी मुंबईत यावे आणि बैठकीत सहभागी व्हावे, असा संदेश भुजबळ यांनी दिलाय.

त्यामुळे आता ओबीसी नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? या बैठकीतून नेमकी काय भूमिका घेतली जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका ओबीसी नेत्यांची आहे. आता मराठा समाजाप्रमाणे ओबीसी समाजही आंदोलनाच्या मैदानात उतरणार का? ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखील होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची हाक दिली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oldest fort in India: भारतातील सर्वात जुना किल्ला कोणता आहे?

Maharashtra Live News Update: मनोज जरांगेंचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले

Mukesh Ambani : अंबानींच्या घरी रोज बनवल्या जातात तब्बल ४००० चपात्या! वाचून व्हाल थक्क

Priya Marathe: प्रिया मराठेचे 'तू तिथे मी' मालिकेतील फोटो पाहिलेत का?

जीएसटीत मोठा बदल! बाईक आणि स्कूटर खरेदीदारांसाठी खुशखबर; दुचाकी स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT