ncp crisis Saam TV
महाराष्ट्र

NCP Crisis: 'घड्याळा'मुळे गोंधळ; अजित पवार गटाला नवे चिन्ह द्या.. शरद पवार गटाची मोठी मागणी; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Supreme Court On NCP Party And Symbol Hearing: शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत दाखल केलेल्या याचिकेवर आज (मंगळवारी) सुनावणी होणार होत आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. १९ मार्च २०२४

NCP Party And Symbol Hearing:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत दाखल केलेल्या याचिकेवर आज (मंगळवारी) सुनावणी झाली. ज्यामध्ये घड्याळ चिन्हामुळे गोंधळ होत असून त्यांना दुसरे चिन्ह द्यावे असा युक्तीवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

आजच्या सुनावणीत काय घडलं?

"ग्रामीण भागातील लोक, महिला कन्फ्युज आहेत की पक्ष कोणाचा? आम्हाला दिलेलं चिन्ह 2 महिने आधी दिलं आहे. 25 वर्षांपासून घड्याळ चिन्ह शरद पवार यांच्या नावासमोर जोडलं गेल आहे. आता मत मागताना घड्याळाला मत द्या असा प्रचार केला जात आहे, घड्याळामुळे महाराष्ट्रात गोंधळ होत आहे, त्यांना दुसरे चिन्ह द्या" असा दावा शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.

यावर बोलताना "तुमचा पक्ष आता तुमच्या नावाने ओळखला जातोय. भारतातील नागरिक हे जागरूक आहेत. राजकीय दृष्ट्या ते सक्रिय आहेत, असे कोर्टाने नमूद केले. तसेच त्यांना घड्याळच का पाहिजे? त्यासाठी ते एवढं का प्रयत्न करत आहेत? असा सवाल अभिषेक मनू सिंघवी यांनी कोर्टाला विचारला. यावर कोर्टाने पक्ष आणि चिन्ह यांचं एकमेकांशी खूप जवळचं नातं आहे," असे उत्तर कोर्टाने दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार गटाचा युक्तीवाद काय?

तसेच "आम्हाला दुसरे चिन्ह नको, घड्याळ हे चिन्ह शरद पवार किंवा अजित पवार यांचं नाही, तर घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे. आणि आयोगाने (निवडणूक आयोगाने) तो पक्ष अजित पवार यांना दिला आहे," असा युक्तीवाद मुकुल रोहोतागी यांच्याकडून करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा आठवड्यांनी होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT