Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha ElectionSaam Digital

Maharashtra Lok Sabha Election : शिंदे गटाच्या तीन विद्यमान खासदारांना मिळणार डच्चू? १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर

Lok Sabha Election २०२४ : शिवसेना एकनाथ शिंदे गट १४ जागा लढवणार असून १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यातील तीन विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
Published on

Maharashtra Lok Sabha Election

मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकण्याची ध्येय महायुतीने ठेवलं आहे. भाजपने महाराष्ट्रातील २० जागा जाहीर केल्या तरी शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र आज शिंदे गट १४ जागा लढवणार असून १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यातील तीन विद्यमान खासदारांना डच्चू देण्याची शक्यता आहे.

मंत्री संजय राठोड यांनी भावना गवळी यांच्या जागी निवडणूक लढवावी असा अहवाल भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलाय. रामटेकचे खासदार कृपालजी तुमाणे आणि कोल्हापूचे खासदार संजय मंडलिक यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेच्या सर्व्हेत या तीन विद्यमान खासदारांची जागा धोक्यात आहे असल्याचं समोर आलं होत. तर पालघरचे राजेंद्र गावीतहे भाजपमधून आलेले उमेदवार आहेत, त्यामुळे ही जागा भाजपाला जावू शकते किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असू शकतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणत्या जागेवर कोणाला मिळणार उमेदवारी?

१) हेमंत पाटील , हिंगोली

२) श्रीरंग बारणे, मावळ

३) भावना गवळी, वाशिम ( यांना मिळू शकतो डच्चू यांच्या जागी संजय राठोड यांना उमेदवारी मिळू शकते )

४) धैर्यशील माने, हातकणंगले

५) सदाशिव लोखंडे, शिर्डी

६) हेमंत गोडसे, नाशिक

७) कृपालजी तुमाणे, रामटेक (यांना मिळू शकतो डच्चू )

८) श्रीकांत शिंदे, कल्याण

९) राहुल शेवाळे, इशान्य मुंबई

१०) राजेंद्र गावीत, पालघर ( गावीत हे भाजपातून आलेले उमेदवार त्यामुळे ही जागा भाजपाला जावू शकते किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असु शकतात )

११) प्रतापराव जाधव, बुलढाणा

१२) संजय मंडलिक, कोल्हापूर ( यांना मिळू शकतो डच्चू )

Maharashtra Lok Sabha Election
Loksabha Election 2024: काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव; प्रकाश आंबेडकरांचे मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र

राज्यात भाजप लोकसभेच्या ३१ ते ३२ जागा लढविण्यावर ठाम होतं. तर शिवसेना शिंदे गटाला १२ ते १३ जागा आणि अजित पवार गटाला ४ जागा देण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विचारविनिमय सुरू होता.जागावाटपाचा अंतिम निर्णय हा दिल्लीत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. उमेदवार निवडीमध्ये महायुतीकडून धक्कातंत्र वापरण्याची शक्यता असून अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटासह भाजपच्या विद्यमान खासदारांमध्ये धाकधूक आहे.

Maharashtra Lok Sabha Election
Pune News: भाजपकडून पुण्यात आचारसंहितेचा भंग, आमदार रविंद्र धंगेकर यांचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com