Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, मनोज जरांगेच्या दाव्यावरून राजकारण तापणार

Maharashtra Politics: छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते पलटी मारतील असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरजार खडाजंगी सुरू आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेंकांवर बोचरी टीका केली होती. त्यामुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान त्यांच्यातील आरोप प्रत्यारोप आता राजकीय व्यासपीठावर पोहोचले आहेत. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते पलटी मारतील असा दावा जरांगे यांनी केल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील सध्या अहमदनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी भुजबळ यांच्यासंबंधित हा दावा केला आहे. छगन भुजबळ यांना भाजपने ऑफर दिली असेल. त्यामुळे गृहमंत्री त्यांना काही बोलत नाहीत की थांबवत नाहीत. मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही ठरलं आहे का, अशी शंका येत आहे. त्यांना पलटी मारायची सवय आहे. आतापर्यंत त्यांनी दहा ते पंधरा पलट्या मारल्या आहेत, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. तर ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. त्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायेत. दरम्यान जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याची आज बिड जिल्ह्यात सांगता होणार आहे.

फलक फाडल्यामुळे काहीही होणार नाही, त्यामुळे मराठा समाजाने शांतता राखली पाहिजे. मात्र, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नेमकं काय आहे, हे त्यांनी एकदा सांगून टाकावं. कारण अंबडमध्ये झालेल्या ओबीसी सभेचा एकही बॅनर कोणी फाडला नाही. त्यांना सरकारचे पाठबळ असेल, अशा आरोप जरांगे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Maharashtra Rain Live News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे, दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी, VIDEO

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला; रस्ता ब्लॉक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडापावला मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

SCROLL FOR NEXT