Nana Patole on Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का! विद्यमान महिला आमदार बांधणार 'घड्याळ'? बॅनर्स झळकल्याने रंगल्या चर्चा

Maharashtra Politics Breaking News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेतही सुलभा खोडके यांनी दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती

Congress MLA Sulbha Khodke News: मला काँग्रेसमध्ये सातत्याने डावललं गेलं,मला काँग्रेसच्या बैठकीत बोलावलं जात नाही,मी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माझे फोन घेतले नाही.त्यांनी मला उत्तर दिलं नाही, असे गंभीर आरोप काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी केले आहेत. काँग्रेसकडून डावलले जात असल्यामुळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेतही सुलभा खोडके यांनी दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. मी पाच वर्षे पासून काँग्रेसचे आमदार आहे, विरोधी पक्षाची आमदार असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला विकास कामासाठी भरीव मदत केली,निधी दिला. त्यामुळे ते 13 तारखेला अमरावती असल्याने त्यांचा सत्कार मी करत आहे. मला काँग्रेस मध्ये सातत्याने डावललं गेलं,मला काँग्रेसच्या बैठकीत बोलावलं जात नाही, असे आरोप सुलभा खोडके यांनी केले आहेत.

मी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माझे फोन घेतले नाही.त्यांनी मला उत्तर दिले नाही. तसेच जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी दुसऱ्या पक्षातून नेते आल्यामुळे (माजी मंत्री सुनील देशमुख यांचे नाव न घेता) रोज मला डावलत होते. जो मला तिकीट देईल मी त्यांच्यासोबत लढणार आहे, सध्या मी काँग्रेसमध्येच आहे असा दावा काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी केला.

दरम्यान, आमदार सुलभा खोडके यांच्यावर विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप आहे. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश करनार असल्याच्या जोरदार चर्चा आहे. त्यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया देत आपलं म्हणणं मांडले आहे. महत्वाचे म्हणजे काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी शहरात अजित पवारांच्या स्वागताचे मोठे होर्डिंग बॅनर लावलेले आहेत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीमधील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

SCROLL FOR NEXT