Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: वर्षा बंगल्यावरील जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये! अजित पवारांचा संताप; म्हणाले “चहात काय…”

आपले हसरे चेहरे दाखवण्यासाठी पैशाची उधळपट्टी सुरू असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: सोमवारपासून, राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी आज, विरोधी पक्षांनी आज अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ज्यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेत्यांविरोधात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली.

काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते, आदित्य ठाकरे (Aditya Theackeray) यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, या गोष्टीचे सरकारला गांभीर्य नाही का," असा सवाल पवार यांनी केला. (Latest Marathi News)

चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का?

“कामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये आलेले आहे. मी उपमुख्यमंत्री होतो. आमचे काही सहकारीदेखील मुख्यमंत्री होते. चार महिन्यात जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये आले. एवढं बील कसं काय? चहामध्ये सोन्याचं पाणी वगैरे घातलं होतं का? सरकार चहात सोन्याचा अर्क टाकते का?” असा खोचक सवाल पवार यांनी केला.

जाहिरातींवर उधळपट्टी...

"जाहिरातींवर 50 कोटी सरकारने खर्च केले आणि मुंबई महापालिकेने 17 कोटी रुपये सरकारने जाहिरातींवर खर्च केले आहेत. आपले हसरे चेहरे दाखवण्यासाठी ही उधळपट्टी सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नाही आणि दुसरीकडे महामंडळाच्या पानभर जाहिराती प्रसिद्ध होत आहे. हा प्रकार चिड आणणारा असल्याचे पवार यांनी म्हटले. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaubeej 2026 Wishes : सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती! भाऊबीजेनिमित्त पाठवा हे मनाला भिडणारे शुभेच्छा संदेश; नात्यात वाढेल गोडवा

Maharashtra News Live Update: सतेज पाटलांची पत्रकार परिषद

Heart Health : हृदयविकाराच्या रुग्णांसाठी काजू-बादाम वरदान की शाप? तज्ज्ञांचा हा खुलासा वाचायलाच हवा

'मला धमकी देऊ नका,मीही पाटील आहे'; सतेज पाटलांचा चंद्रकांतदादांना सणसणीत टोला

Rohit Sharma Video: रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार; मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या त्या 2 शब्दांनी शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT