Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजित पवार गटाला हादरा! बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

Maharashtra Political News : माजी खासदार संजय पाटील हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. ते भाजपमध्ये परतणार असल्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

Yash Shirke

Maharashtra : काँग्रेसचे सांगली शहराचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या (१३ ऑगस्ट) पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सांगली दौऱ्यावर आहेत. ते पृथ्वीराज पाटील यांच्या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

रवींद्र चव्हाण यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान त्यांच्या डिनर डिप्लोमेसीची मोठी चर्चा होत आहे. त्यांनी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयश्री पाटील यांचा विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्त्व स्वीकारणाऱ्यांचे भाजपमध्ये स्वागत होईल, असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

'भाजपमध्ये येणारे नेते, कार्यकर्ते यांचा योग्य मान राखला जाईल. जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी दिली जात आहे. काही ठिकाणी वाद असले तरी पक्षाच्या निर्णयानंतर कोणी वेगळा विचार करत नाही', असे रवींद्र चव्हाण म्हणाले. सांगलीत पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा 'संजय पाटील वेगळ्या पक्षात गेले. ते भाजपमध्ये पुन्हा येऊ इच्छित आहेत. पक्ष त्यांच्या प्रवेशाबद्दल सकारात्मक आहे' असे उत्तर रवींद्र चव्हाण यांनी दिले.

संजय पाटील हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेमुळे संजय पाटील यांच्या भाजपमध्ये परतण्याच्या चर्चा बंद झाल्या होत्या. पण आता रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे संजय पाटील भाजपमध्ये परततील अशी शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश

Ladki Bahin Yojana: दरमहा मिळतात १५०० रुपये, सरकारच्या योजनेवरच लाडक्या बहिणी रुसल्या | VIDEO

Maharashtra Tourism: महाराष्ट्रात फिरण्याचा प्लान करताय, मग 'या' सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या

Tech News: सावधान! ऑफिसच्या लॅपटॉपवर WhatsApp Web चालवणं आहे घातक, काय आहे धोका?

Pune: पुण्यात भररस्त्यात ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकाचा राडा, शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT