Crime : २१ वर्षीय तरुणीचा रात्री संशयास्पद मृत्यू, पहाटेच अंत्यसंस्कार, नेमकं कारण काय?

Jalna Crime : जालनामध्ये एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यूनंतर पोलिसांना माहिती न देता तरुणीच्या नातेवाईकांनी तिचा अंत्यविधी केला. या प्रकरणामुळे पोलिसांनी नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.
Jalna Crime
Jalna Crimesaam tv
Published On
Summary
  • जालना जिल्ह्यात २१ वर्षीय अर्पिता वाघ हिचा गळफासामुळे संशयास्पद मृत्यू झाला.

  • नातेवाईकांनी पोलिसांना माहिती न देता पहाटेच अंत्यविधी करून पुरावा नष्ट केला.

  • पोलिसांनी नातेवाईकांवर गुन्हा दाखल करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा तपास सुरू केला.

अक्षय शिंदे पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Jalna : जालना जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. जालन्यातील एका गावात २१ वर्षीय संशयास्पद तरुणीचा मृत्यू झाला. तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या मृत्यूची माहिती पोलिसांना दिली नाही. उलट त्यांनी लगेच पहाटे तिचा अंत्यविधी देखील केला. संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांना माहिती न देता अंत्यविधी केल्याने पोलिसांनी नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव अर्पिता वाघ असे आहे. जालना जिल्ह्यातील वंजार उम्रद गावामध्ये २१ वर्षीय तरुणीचा काल (११ ऑगस्ट) रात्री संशयास्पद मृत्यू झाला. या तरुणीचा मृत्यू गळफासामुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे शोधण्यासाठी तपास सुरु केला आहे.

Jalna Crime
Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

संशस्यापद मृत्यूनंतर पोलिसांना माहिती देणे आवश्यक असते. गळफासाने तरुणीचा मृत्यू झाला, पण तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या मृत्यूची माहिती पोलिसांना न देता घाईगडबडीत आज (१२ ऑगस्ट) पहाटेच अंत्यविधी केला. यामुळे पोलिसांनी तरुणीच्या नातेवाईकांवर संशय व्यक्त केला आहे. तिच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna Crime
Beed : तुझाही संतोष देशमुख करू; हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या डॉक्टरच्या भावावर प्राणघातक हल्ला

तरुणीच्या मृत्यूची नोंद तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. आज (१२ ऑगस्ट) पोलिसांनी ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला, तेथे जाऊन मृतदेहाच्या राखेसह अवशेषाचे नमुने घेतले. संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांना माहिती न देता मृतदेहावर परस्पर अंत्यविधी करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Jalna Crime
Pune : मी अरुण गवळीचा पीए बोलतोय... व्यावसायिकाकडे ५ कोटींची मागणी; पुण्यात तोतया गँगचा पर्दाफाश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com