Ravi rana  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: रवी राणा यांचा भाजपला झटका, वरिष्ठ नेत्याचा युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश

Maharashtra Assembly Election 2024: दर्यापूरचे भाजपाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश बुंदिले यांनी कार्यकर्त्यांसह रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सर्वच पक्षांतील नेते मंडळी पक्षांतर करत आहेत. अशामध्ये अमरावतीमध्ये रवी राणा यांनी भाजपला मोठा झटका दिला आहे. दर्यापूरचे भाजपाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश बुंदिले यांनी कार्यकर्त्यांसह रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार अभिजीत अडसूळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या नेत्यांनी महायुतीमध्ये बंडखोरी करण्यास सुरूवात केली आहे. अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजप नेते रमेश बुंदिले नाराज झाले आहेत. कारण रमेश बुंदिले हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण त्यांना महायुतीकडून उमेदवारी न मिळल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

दर्यापूर मतदारसंघातून रमेश बुंदिले युवा स्वाभिमानकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता अभिजीत अडसूळ आणि रमेश बुंदिले यांच्यात लढत होणार आहे. आमदार रवी राणा यांचा देखील अभिजित अडसूळ यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्याविरोधात अभिजीत अडसूळ यांनी काम केल्याने विधानसभा निवडणुकीत रवी राणा आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत अभिजीत अडसूळ आणि आंनदराव अडसूळ यांनी महायुती धर्म पाळला नसल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजपला धक्का, दिनकर पाटील मनसेमध्ये; विधानसभेची उमेदवारीही दिली

Maharashtra Election : मनसेची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात राज ठाकरेंचा हुकमी एक्का मैदानात

Diwali 2024: धनत्रयोदशीला बनवा खोबऱ्याच्या लाडूचा नैवेद्य; नोट करा सिंपल रेसिपी

Nilesh Rane Join Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश

MVA Seat Sharing Formula : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला; ठरला 85-85-85 फॉर्म्युला, मित्रपक्षांसाठी किती जागा?

SCROLL FOR NEXT