Milind Deora News Saamtv
महाराष्ट्र

Milind Deora Resign: मिलिंद देवरांचा पक्षाला 'रामराम', कॉंग्रेसच्या गोटात खळबळ; बाळासाहेब थोरात म्हणाले; 'निर्णय दुर्दैवी...'

Milind Deora News: कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून ५६ वर्ष कॉंग्रेससोबत असलेले नेते, माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मिलिंद देवरा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Gangappa Pujari

Milind Deora Resign:

आजपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात होत आहे. अशातच महाराष्ट्रात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून ५६ वर्ष कॉंग्रेससोबत असलेले नेते, माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मिलिंद देवरा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा यांनी घेतलेला निर्णय कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ट्वीट करत या निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया..

आमचे सहकारी मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

तसेच देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल, असेही बाळासाहेब थोरात (Balasaheb Thackeray) यांनी म्हटले आहे.

वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया..

"काँग्रेस परिवार आणि देवरा परिवार हे कुटुंब आहे. मिलिंद देवरा यांनी घेतलेला निर्णयाचा फेरविचार करावा. मी आणि प्रभारी त्यांच्यासोबत सतात संवाद साधत होतो. आज पासून भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे आणि त्यांनी हा घेतलेला निर्णय मनाला लागणार आहे," असे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हणले आहे.

दरम्यान, "मिलिंद देवरा यांच्या निर्णयानंतर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. देवरा यांच्याबरोबरचे दिवस मला आठवतात. मुरली देवरा यांचे सर्वच पक्षांमध्ये मित्र होते. पण, ते नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले. तथास्तु!," असे ते म्हणालेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे काय त्रास होतो? अमेरिकेतल्या डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Local Body Election : पोलिसांच्या तावडीतील बोगस मतदार आमदाराच्या मुलानं पळवला; बुलढाण्यातील प्रकार|VIDEO

Maharashtra Live News Update: राजभवनाचं नाव आता ‘लोकभवन’

Chole Bhaji Recipe: ढाबा स्टाईल चमचमीत छोले भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT