Rohit Pawar: 'विकासाचे मुद्दे नसल्याने राम मंदिरावर इलेक्शन...' रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

Rohit Pawar On Ram Mandir Inauguration: शंकराचार्यांना सर्व धार्मिक पद्धती माहिती असतात त्यामुळे त्यांनी 22 तारखेला तेथे जाण्यासाठी बहिष्कार टाकला असावा," असे रोहित पवार यावेळी म्हणाले.
Rohit Pawar News
Rohit Pawar Newssaam tv
Published On

Solapur News:

राम मंदिर उद्घाटन सोहळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. एकीकडे देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत असतानाच राजकीय वातावरणही तापू लागल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिर उद्घाटन हा धार्मिक सोहळा नसून भाजपचा इव्हेंट असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाकडून होत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही शंकराचार्यांनी जाण्यास नकार दिल्याचे सांगत भाजपवर टीका केली. "शंकराचार्यांना सर्व धार्मिक पद्धती माहिती असतात त्यामुळे त्यांनी 22 तारखेला तेथे जाण्यासाठी बहिष्कार टाकला असावा," असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

तसेच "22 तारखेच्या कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रम कमी आणि राजकीय कार्यक्रम जास्त होत आहेत असा धर्मगुरूंचा आरोप आहे. मंदिर पूर्ण होण्याआधीच तो कार्यक्रम घेतला जातो त्यामुळे लोकांना राजकीय वास येत आहे. तसेच विकासाचे मुद्दे भाजपकडे राहिले नाहीत त्यामुळे राम मंदिरावर इलेक्शन लढायचे आहे," अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit Pawar News
Wardha News: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाकडे बँकांची पाठ; निम्यापेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित

संघर्ष यात्रा सुरू झाल्यापासून माझ्यावर कारवाई..

"माझ्या संस्थेवर जेव्हा कारवाई झाली तेव्हा मी इथे नव्हतो. काही तज्ञ लोकांनी सांगितले की दहा दिवस येऊ नका मात्र तरीही मी इथे आलो. मराठी माणसं कोणाला घाबरत नाहीत आणि दिल्ली समोर कधीही झुकत नाहीत, माझी संघर्ष यात्रा झाल्यानंतर माझ्यावर कारवाई सुरू झाली," असे आरोपही रोहित पवार यांनी केले. (Latest Marathi News)

Rohit Pawar News
Parbhani News: मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या; परभणीतील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com