राजेश काटकर
मराठा आरक्षण मिळावं यासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणी तालुक्यातील सनपुरी येथे एका ३४ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सचिन राम शिंदे असं या मृत युवकाचं नाव आहे. मयत तरुणाकडे मराठा आरक्षण मिळावे या आशयाचा मजकूर लिहिलेली एक चिठ्ठी देखील आढळून आलीये.
"मी सचिन रामराव शिंदे, राहणार परभणी. मराठा आरक्षण मिळत नसल्याने, मी स्वत:ला संपवत आहे." असं त्याने चिठ्ठीत लिहिलंय. तसेच पुढे एक मराठा लाख मराठा असंही लिहिलंय. मराठा आरक्षणासाठी आजवर अनेक तरुणांनी आपलं जीवन संपवलं आहे.
मनोज जरांगेंचा मुंबई आंदोलनाचा मार्ग मोकळा
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नका, अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे. इतकंच नाही, तर कोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलंच फटकारलं देखील आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
२० जानेवारीला ३ कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच येत्या २० जानेवारीला ३ कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.