मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील २० जानेवारीपासून अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर मुंबईत ते बेमुदत उपोषण करणार आहेत. दरम्यान डिसेंबरमध्ये त्यांनी कोणीही माझ्या किंवा आंदोलनाच्या नावाने पैसे मागू नये, मागत असेल तर देऊ नका, असे जाहीर सांगितलं होतं. त्यानंतरही छत्रपती संभाजीनगरात काहीजण जरांगे यांच्या नावाने मुंबईला जाण्यासाठी अधिकाऱ्यांकडे थेट पैशांची मागणी करीत आहेत. तुमच्याकडून होत नसेल तर उद्योजकांकडून घेऊन द्या, असा आग्रही धरत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितलं.(Latest News)
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे जरांगे यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. आता राज्यातील मराठा (Maratha) बांधवांनी मुंबईला यावे, असे आवाहन त्यांनी केलंय. मुंबईला येताना मुक्कामी राहण्याचे साहित्यसोबत आणावे आणि स्वतःचा खर्च स्वतः करावा, असेही ते म्हणाले. शिवाय पदयात्रेच्या नावाखाली कोणी पैसे मागत असल्यास देऊ नका, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यानंतरही शहरातील काही संघटनेचे पदाधिकारी शासकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन पैशांची मागणी करीत आहेत.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
‘तुम्ही द्या, तुमच्याकडून होत नसेल तर उद्योजकांना पैसे देण्यास सांगा, असा आग्रह ते धरत आहेत. यातून स्वत:चे घर भरण्याचे काम होत आहे. पण अधिकारी किंवा इतरांना पैसे मागण्यास जरांगे यांचा पूर्वीपासून विरोध आहे. त्यांच्या परस्पर ही दुकानदारी सुरू आहे. त्यामुळे कुणीही पैसे देऊ नये, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे.
आरक्षणाची (Reservation) लढाई अंतिम टप्प्यात आहे. यासाठी येणार खर्च समाजबांधव स्वतः करीत आहेत. आरक्षण व समाजाच्या नावाखाली जनतेने कोणाला वैयक्तिक रूपात पैसे देऊ नयेत. याविषयी मी पूर्वीही सांगितले होते. आताही त्यावर ठाम आहे. ज्याने-त्याने समाजासाठी वैयक्तिक खर्च करावा. आंदोलनाच्या नावाखाली कोणी परस्पर गैरकाम करत असेल तर तत्काळ मला कळवा. समाजाचे आपण देणे लागतो म्हणून स्वखर्चाने यात सहभागी व्हा, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.