Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेची घोषणा

Maharashtra Assembly Election Result 2024: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निकालावर साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली. नवं सरकार स्थापन होताच पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Priya More

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला. या निवडणुकीमध्ये २३२ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. या निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली. 'नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा आमरण उपोषण करणार.', अशी घोषणा जरांग पाटील यांनी केली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निकालावर साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली. 'विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं आहे. दरम्यान लोकसभेला महाराष्ट्रासह मराठवाड्यात जसा मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालला तसा या विधानसभेला चालला नाही असं बोललं जात आहे. मात्र मी विधानसभेच्या रिंगणात नव्हतोच तर माझा फॅक्टर कसा चालणार.' , असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

तसंच, 'मराठा आरक्षणासाठी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आंतरवाली सराटीत सामूहिक आमरण उपोषण करणार.', अशी घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. याचच अर्थ मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर ठाम असून त्यांनी पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नवं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या समोर मराठा आरक्षणाचा मुद्दा कायम राहिल.

दरम्यान, राज्यात महायुतीला २८८ जागांपैकी २३२ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. महायुतीमधील भाजपचे १३५ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाचे ५७ विधानभा मतदारसंघातील उमेदवार विजयी झाले. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४१ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विजयी झाले. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. आज महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नवनिर्वाचित आमदार मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री कोण असेल हे आज स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT