Deputy CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Shivsena District Chief Ashwin Navale Quits: अकोल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. पक्ष सोडण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले.

Priya More

Summary -

  • अकोल्यात शिंदेसेनेला मोठा धक्का

  • जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचा तडकाफडकी राजीनामा

  • गोपीकिशन बाजोरिया यांच्यासोबत पक्ष सोडल्याची माहिती

  • अकोल्यात पक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा उघड झाला आहे

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिंदेसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी आज आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पत्र लिहून राजीनामा का देत आहे या मागचे कारण देखील सांगितले. पक्षातील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. त्यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अश्विन नवले यांनी शिंदेसेनेची साथ सोडली खरी पण ते भविष्यात कोणत्या पक्षात प्रवेश करणार किंवा त्यांची भविष्यातील राजकीय भूमिका काय असणार हे त्यांनी सांगितले नाही.

अश्विन नवले यांनी पत्रात असे लिहिले की, 'जय महाराष्ट्र, साहेब... सर्वप्रथम आपण विचारांची क्रांती केली, तेव्हा सर्वप्रथम आपल्या सोबत अकोल्यातून येणारे आम्ही आहोत. एका विचाराने पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे अकोला जिल्ह्यात काम केले. परंतू गोपीकिशन बाजोरिया (माजी आमदार) या अशा विचारहीन आणि स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीसोबत काम करणे, आता माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मनाला पटणार नाहीये, आम्ही समाजसेवक आहोत व राहू. परंतू पक्षाच्या पदासाठी बाजोरिया यांचे गुलाम बनून राहू शकत नाही. त्यामुळं माझा हा राजीनामा आपण स्वीकार करावा. जय महाराष्ट्र.'

दरम्यान, अश्विन नवले हे अकोल्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते अकोला जिल्हाप्रमुख म्हणून या पदावर कार्यरत असून एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांची ही नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे अकोला पश्चिम, मूर्तिजापूर आणि अकोट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, अकोला जिल्ह्यात शिवसेनेने दोन जिल्हा प्रमुख नियुक्त केले होते.

अश्विन नवले यांच्याकडे विधानसभा निहाय्य जबाबदारी विभागून देण्यात आली होती. अश्विन नवले यांच्याकडे अकोला पश्चिमसह मूर्तिजापूर आणि अकोट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी राहणार आहे. विठ्ठल सरप यांच्याकडे अकोला पूर्व व बाळापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तेव्हापासून नवले नाराज होते, अशीही माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक

Shocking : घरात कोणीही नसताना सैतान जागा झाला, तोंड,हात बांधून भावाकडून बहिणीवर बलात्कार

Work from home health risks: लॅपटॉपची उष्णता शरीरासाठी घातक? तज्ज्ञांनी दिला वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना महत्त्वाचा इशारा

सोलापूर हादरलं! विवाहितेनं दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं

केस गळती कायमची थांबेल! तांदूळ आणि मेथीचा घरगुती हेअर स्प्रे केसांना देईल मजबूती

SCROLL FOR NEXT