Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ असे असतात ज्याचा वापर तुम्ही केसांसाठी नैसर्गिकरित्या करू शकता.
तुम्हाला माहितीये का? मेथी दाणे आणि तांदूळ यांचे पाणी केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
तांदळाचे पाण्यामध्ये 'इनॉसिटॉल' असते जे केसांना दुरूस्त करते. केसांमधील कोरडेपणा कमी करते.
मेथी दाण्यामध्ये प्रोटीन आणि 'निकोटिनिक ॲसिड' असते जे केसांची मुळे घट्ट करतात आणि केसांतील कोंडा कमी करतात.
तांदूळ आणि मेथीचे दाणे यांचे पाणी तुम्ही केसांना लावल्यास केस गळती कमी होण्यास मदत होते.
तांदूळ आणि मेथी दाणे हेअर स्प्रे बनवण्यासाठी गॅसवर एका भांड्यामध्ये तांदूळ, मेथी दाणे पाण्यात उकळून घ्या
उकळल्यानंतर हे पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. केस धुतल्यानंतर तुम्ही केसांना हेअर स्प्रे मारू शकता यामुळे केसांचे गळणं थांबेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.