Manasvi Choudhary
पपई हे फळ आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. पपई खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
मधुमेहाची समस्या असलेल्या व्यक्तींनी पपईच्या पानांचा रस करून प्या.
पपईच्या पानांचा रस प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पपईच्या पानांतील घटक इन्सुलिनची क्षमता वाढवतात यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.
पपईच्या पानांचा रस बनवण्यासाठी पपईची ताजी पाने स्वच्छ धुवून घ्या.
एका भांड्यात पाण्यामध्ये ही पाने टाका आणि पाणी उकळून घ्या. नंतर हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे प्या.