eknath shinde x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राजकीय उलथापालथ! एकनाथ शिंदेंची ताकद वाढली, चंद्रकांत पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

Navi Mumbai Political News : नवी मुंबईत शरद पवार गटाला खिंडार पडल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नवी मुंबईत खिंडार

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

विकास मिरगणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूका प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी राज्यातील प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

एका बाजूला निवडणुकांसाठी तयारी करत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी मुंबईत खिंडार पडल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या नेत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. यामुळे शिंदेसेनेची ताकद वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडला.

शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चंद्रकांत पाटील यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष होते. पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यामुळे नवी मुंबईत शरद पवार गटाला धक्का बसला आहे, तर शिंदे गटाची शक्ती वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Badlapur Travel : साहसी प्रेमींसाठी पर्वणी बदलापूरमधील 'हे' ठिकाण, येणारा वीकेंड होईल खास

Municipal Elections : धुरळा उडणार! आयोगाची आज महत्त्वाची बैठक, महापालिका निवडणुकीची तारीख आली समोर

Bigg Boss 19 : गौरव खन्ना नाही; तर मग 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोणाचे नाव?

SCROLL FOR NEXT