Amol Mitkari on Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत वादाच्या ठिणग्या! अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवताच राष्ट्रवादीचे नेते भडकले; अमोल मिटकरींचं थेट फडणवीसांना आव्हान

Amol Mitkari on Devendra Fadnavis: भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान ही घटना घडली. यावरून आता राजकारण तापले आहे.

Priya More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला जुन्नरमधील नारायणगावमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान ही घटना घडली. यावरून आता राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आक्रमक झाले असून या घटनेचा निषेध करत त्यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत श्री देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा.', असे म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपसोबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'महायुतीच्या एकतेला कोणी गालबोट लावत असेल तर भाजपने त्यांना ताकीद द्यावी. अनेक जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री आहेत. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विविध जिल्ह्यात जाऊन शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतात. त्यावेळी महायुतीतील इतर घटक पक्ष त्यावर आक्षेप घेत नाहीत. मग पालकमंत्री म्हणून अजित पवार आम्हाला डावलतात. असा आक्षेप कशासाठी? भाजपच्या नेत्या आशा बुचकेंच्या या टीकेला उत्तर देण्याची मला तरी काही गरज वाटत नाही.' तसंच, मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री नावाचा उल्लेख केला जात नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. महायुतीत कोणताही दुरावा निर्माण झालेला नाही.' असे देखील तटकरे यांनी सांगितले.

अजित पवारांना काळे झेंडे दाखवणे ही निव्वळ स्टंटबाजी असल्याचे म्हणत रुपाली चाकणकरांनी आशा बुचकेंची खिल्ली उडवली खिल्ली. त्यांनी सांगितले की, 'भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचकेंनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले ही निव्वळ एक स्टंटबाजी होती. काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना भेटल्या असत्या तर प्रश्न मार्गी लागायला मदत झाली असती. पण केवळ बातम्या व्हाव्यात म्हणून बुचकेंनी ही स्टंटबाजी केली, असा पलटवार रुपाली चाकणकरांनी केला. बुचकेंच्या या भूमिकेने महायुतीत कोणताही खडा पडणार नाही, असा दावा ही रुपाली चाकणकरांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT