Ajit Pawar Criticized Sadabhau Khot Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ...तर खपवून घेणार नाही, शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सदाभाऊ खोतांना अजित पवारांचा इशारा

Ajit Pawar Criticized Sadabhau Khot: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावरून संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट सदाभाऊ खोत यांना इशारा दिला आहे.

Priya More

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठीसध्या सर्व पक्षांकडून राज्यभर प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. या प्रचारादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यांचा आरोप-प्रत्यारोपांचा सिलसला सुरूच आहे. अशामध्ये महायुतीमधील घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर त्यांच्या शारिरीक व्यंगावरून टीका केली. सदाभाऊ खोत यांची जीभ घसरल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून टीका केली जात आहे. अशामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावरून संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट सदाभाऊ खोत यांना इशारा दिला आहे.

अजित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य निंदनीय असल्याचे म्हटले आणि त्यांना थेट इशारा दिला. अजित पवार यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'ज्येष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही.', असा धमकी वजा इशारा अजित पवारांनी सदाभाऊ खोतांना दिला.

सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी महायुतीची प्रचारसभा नुकताच पार पडली. या प्रचारसभेमध्ये महायुतीमधील घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत हे देखील सहभागी झाले होते. इतर नेत्यांप्रमाणे सदाभाऊ खोत यांनी देखील विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. मात्र त्यानंतर त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. पण त्याची जीभ घसरली. 'शरद पवार यांना ९ महिने लागले आणि कळा फुटल्या. पण शरद पवारांना मानावं लागेल. शरद पवार सांगत सुटले आहेत की, मला महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे. त्यांना कसला चेहरा बदलायचा आहे. तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र घडवायचा आहे का?, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली.

शरद पवारांबाबत वक्तव्य करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. ते शरद पवारांच्या शारिरीक व्यंगावरून वादग्रस्त वक्तव्य करत असताना मंचावर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर सदाभाऊ खोतांना शरद पवारांबाबत असे बोलताना लाज कशी काय वाटली नाही असा सवाल केला केला आहे. 'महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही, शरद पवारांचा १०० टक्के वाटा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोलणे यावरुन तुमची अक्कल शून्यता लक्षात येते.', अशी खोचक टीका आव्हाडांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT