Satara Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: फलटणमध्ये थोरल्या पवारांनी डाव टाकला, आमदाराने तुतारी घेतली; अजितदादा कोणती खेळी करणार?

Priya More

ओंकार कदम, सातारा

सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू त्यांचे चिरंजीव आणि फलटणमधील सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. पश्चिम महाराष्ट्रातील मोठे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाने आज फलटणमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश आहे. रामराजे यांनी जरी प्रवेश केला नसला तरी या संपूर्ण गटाच्या प्रवेशामागे रामराजेंचे अदृश्य हात असल्याचे बोलले जात आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघावर पहिल्यापासून रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती सत्ता आहे. हा मतदारसंघ जरी आरक्षित झाला असला तरी या मतदारसंघाची संपूर्ण गणिते ही रामराजे यांच्या सांगण्यावर हलतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आतापर्यंत तीन वेळा दीपक चव्हाण या सामान्य घरातील कार्यकर्त्याला रामराजे यांनी आमदार बनवून या मतदारसंघातील त्यांची पकड वेळोवेळी दाखवून दिली आहे. रामराजे हे जरी भूमिका जाहीर करत नसले तरी काल मेळाव्यामध्ये झालेल्या भाषणांमध्ये जयंत पाटील यांनीसुद्धा देव जसा आपल्याला दिसत नाही तसा आपला रामसुद्धा आता आपल्याला आपल्या व्यासपीठावर दिसत नाही तरीसुद्धा ते आपल्या सोबतच आहेत.

माढा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद हा संपूर्ण महाराष्ट्राने वळोवेळी पाहिला आहे. यादी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाने उघड उघड विरोधात काम केले होते. निवडणुकीत सुद्धा रामराजे यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. या निवडणुकीत रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिगंबर आगवणे हे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय म्हणून भाजपची उमेदवारी मिळवली होती.

गेल्या काही वर्षांत रणजीत निंबाळकर आणि दिगंबर आगवणे यांच्यामध्ये वैर आल्यामुळे आता दिगंबर आगवणे हे सुद्धा रणजीत निंबाळकर यांच्याविरोधात पूर्ण ताकतीने या निवडणुकीत उतरणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच पद्धतीने लोकसभेला झालेल्या पराभवानंतर रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा करत कांबळे पाटील हे भाजपचे उमेदवार असतील असे जाहीर तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोळशी येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये फोनवरून थेट दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर तरीसुद्धा भाजपकडून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना फलटणमध्ये ताकद मिळत असल्यामुळे रामराजे निंबाळकर उद्या आणि त्यांचा गट नाराज पोलिसांकडून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटावर वारंवार तक्रारी आणि अन्याय होत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते.

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेण्याचा आग्रह देखील केला होता परंतु रामराजे यांनी अजित पवार यांच्याशी बोलणे झाल्यानंतर निर्णय घेऊ असे सांगून ती वेळ मारून नेली होती. परंतू अजित पवार यांच्याबरोबर कोणतेही बोलणे न झाल्याने अखेर रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक खेळी केली आहे. त्याचा गटाचे आमदार दीपक चव्हाण आणि बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घडवून आणला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळूनच आम्ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले आहे.

सध्या शरद पवारांच्या तुतरीचे वारे राज्यात दिसत आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात तुतारीचे वारे वाहू लागल्याने हेच वारे ओळखून रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा पक्ष प्रवेश घडवून आणला आहे. काहीही करून फलटण मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्याच बरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना शह देण्यासाठी रामराजे यांनी आपला गट शरद पवार गटात पाठवला आहे. अद्याप खुद्द रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणतीही भूमिका घेतली नसली तरी काही दिवसांत रामराजे देखील भूमिका घेवू शकतात.

सध्याची रामराजेंनी घेतलेली जी भूमिका आहे या भूमिकेमुळे फक्त फलटण विधानसभा मतदारसंघात नव्हे तर मान खटाव विधानसभा मतदारसंघ, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ या दोन मतदरसंघामध्ये सुद्धा रामराजेंच्या भूमिकेचे परिणाम नक्कीच जाणवणार आहे. रामराजे हे फक्त फलटण विधानसभा मतदारसंघामधील नेते नसून आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे राजकारण हे बऱ्यापैकी रामराजे निंबाळकर हेच बघत होते. त्यामुळे आता या विधानसभेमध्ये रामराजेंच्या या खेळीचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर काय होतात हे आता पहावे लागेल. त्याचप्रमाणे रामराजे यांच्या या अशा निर्णयामुळे जिल्ह्यातील इतर अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांची भविष्यातल्या भूमिका काय असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीतील फलटण विधानसभा मतदारसंघातील मतांची आकडेवारी -

- आमदार दीपक चव्हाण - 117617 (राष्ट्रवादी)

- दिगंबर आगवणे - 86636 (भाजप)

- 30981 मताधिक्याने दीपक चव्हाण विजयी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Insurance: क्या बात, क्या बात! डेबिट कार्डवर फ्रीमध्ये मिळतो जीवन विमा, कधी करता येतो क्लेम, जाणून घ्या

Nanded Bypoll : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; नाना पटोले यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Updates: बदलापुरात महानगर गॅसची मुख्य पाईपलाईन फुटली

New Justice Statue In SC: आता न्यायदेवता डोळस होणार! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीची पहिली लढत ठरली; दोन्ही राष्ट्रवादींमध्ये होणार थेट सामना?

SCROLL FOR NEXT