Maharashtra Politics : अजितदादांनी फोडला काँग्रेसचा दिग्गज नेता; विधानसभेआधी राष्ट्रवादीची ताकद वाढली

Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्याला आपल्या गळाला लावलं आहे.
Congress MLA Hiraman Khoskar joins NCP
Congress MLA Hiraman Khoskar joins NCP Saam TV
Published On

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी आचारसंहितेची घोषणा केली जाऊ शकते. हीच बाब लक्षात घेता राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सतर्क झाले आहेत. त्यांनी पक्षाची जोरदार मोर्चबांधणी सुरु केली असून काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्याला गळाला लावलं आहे.

Congress MLA Hiraman Khoskar joins NCP
Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार; कट्टर शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

काँग्रेसचे इगतपुरीचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी घड्याळ हाती घेतलं आहे. मुंबईत पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार हिरामण खोसकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांची ताकद वाढली आहे. विशेष बाब म्हणजे, हिरामण खोसकर यांनी काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे ते तुतारी हाती घेणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या.

मात्र, आपण शरद पवारांची भेट का घेतली यासंदर्भात खोसकर यांनी स्पष्टीकरण देखील दिलं. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा होती. यामध्ये आमदार खोसकर यांचंही नाव देखील चर्चेत आलं होतं. मात्र, त्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तेव्हापासून खोसकर हे काँग्रेसमध्ये नाराज होते. सोमवारी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, खोसकर यांच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार हिरामण खोसकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही चालवलेल्या कामांची आणि लोकोपयोगी योजनांची ही पोचपावती आहे. त्यांचं मी स्वागत करतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com