Ajit Pawar And Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवारांना मी सोडलं नाही.., अजित पवारांचे बारामतीत मोठं विधान

Ajit Pawar On Sharad Pawar: अजित पवार यांनी शरद पवारांबाबत बारामतीमध्ये मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यांची जोरदार चर्चा होत आहे.

Priya More

'मी शरद पवारांना सोडलं नाही. निधी मिळण्यात अडचण होती. आमदारांच्या आग्रहामुळे निर्णय घ्यावा लागला.', असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले आहे. अजित पवार हे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील टाकळे गावात कोपरा सभेत अजित पवारांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामतीकरांना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

अजित पवारांनी सांगितले की, 'तुम्हाला वाटत असेल की या वयात अजित पवारांनी साहेबांना आता सोडायला नको होतं. मी साहेबांना सोडलं नाही. मी साहेबांना सांगत होतो सर्व आमदारांचे मत होते. सर्वांच्या सह्या आहेत. सर्वाचं मत होतं की सरकारमध्ये जावं. कारण कामाला स्टे आला होता. आपण मंजूर केलेल्या कामाला स्टे आला. हा तापच झाला. लोकं मला वेड्यात काढतील असं मला वाटले. स्टे मी नव्हता दिला सरकारने दिला होता. आता वेळ जाऊन चालत नाही.'

तसंच, '५ वर्षांतील अडीच वर्षे माझी वाया गेली तरी मी बारामती तालुक्याला ९ हजार कोटी रुपये आणले. मी खोटं बोलणार नाही. आता पण साडेतीनशे कोटींचा सासवड- भिगवणं रस्ता मंजूर केला. त्याचा गावकऱ्यांना फायदा होईल. मी अर्थमंत्री असल्यामुळे मी बारामतीकरांना निधी देऊ शकतो. माझ्याकडे साडेसहा लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यातून मला हजार कोटी रुपये काढणं काही अवघड नाही. निवडणूक आली म्हणून मी थापा मारत नाही.', असे अजित पवार यांनी गावकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Thursday Horoscope : जवळच्या माणसांसोबत दिवस आनंदात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे वाढणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

SCROLL FOR NEXT