Sri Lanka Government : श्रीलंकेत डाव्यांचे सरकार, अनुरा कुमार दिसानायकेने मारली बाजी, भारतासाठी किती चिंतेची बाब?

Sri Lanka Government news: श्रालंकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये श्रालंकेचे अध्यक्ष दिसानायके यांच्या नॅशनल पीपल्स पॅावरने संसदेत २२५ पैकी १४१ जागा जिंकून बहुमत मिळवले.
NPP party won the election
Anura DissanayakeYandex
Published On

नवी दिल्ली : (Sri Lanka Government) श्रीलंकेत नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणूकीत अनुरा कुमारा दिसानायके यांनी बाजी मारली आहे. दिसानायके यांचा विजय अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो. श्रीलंकेचे अध्यक्ष दिसानायके यांच्या एनपीपीला संसदेत बहुमत मिळाले. निकालांनुसार, अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या NPP म्हणजेच नॅशनल पीपल्स पॉवरने 225 सदस्यांच्या संसदेत 141 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे.आता अनुरा कुमारा दिसानायके यांच्या खुर्चीला कोणताही धोका नसून ते श्रीलंकेत आरामात सरकार चालवतील हे निश्चित झाले आहे. या निवडणूक निकालाचा अर्थ असा आहे की डाव्या सरकारने श्रीलंकेत आपली मुळे घट्ट केली आहेत.

अशा प्रकारे होते श्रीलंकेची निवडणूक

सप्टेंबरमध्ये, अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मात्र त्यांच्याकडे बहुमत नव्हते. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच अनुरा कुमारा दिसानायके यांनी संसद बरखास्त करून नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून नव्याने निवडणुका घेण्याचे त्यांनी ठरवले होते. श्रीलंकेच्या संसदेत एकूण 225 जागा आहेत. संसदेत बहुमतासाठी 113 जागा आवश्यक आहेत. परंतु केवळ 196 जागांवर जनता प्रत्यक्ष मतदानाने उमेदवार निवडून देते. उर्वरित 29 जागांवर मतांच्या टक्केवारीच्या आधारे विजय-पराजय ठरविला जातो.

NPP party won the election
Pakistan Air Pollution : वायू प्रदुषणामुळे पाकिस्तानात आणीबाणी, तब्बल 20 लाख लोकांची प्रकृती बिघडली, लाहोरमधला आकडा धक्कादायक

श्रीलंकेत डाव्यांचे सरकार येणे भारतासाठी खरोखरच चिंतेची बाब आहे का?

श्रीलंकेत डाव्यांचे अध्यक्ष दिसानायके यांचे सरकार राहणार हे निश्चित झाले आहे. भारतातत डाव्यांकडे पाहाण्याचा दृष्टीकोण हा कायमच वेगळा राहिलेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत दिसानायकेचा श्रीलंकेतील विजय ही भारतासाठी वाईट बातमी आहे का हे समजून घेणे आवश्यक आहे. वास्तविक, 55 वर्षीय डावे नेते दिसायनाके हे AKD म्हणून प्रसिद्ध आहेत. ते मार्क्सवादी विचारसरणी जनता विमुक्ती पेरामुना (JVP) चे प्रमुख आहेत. त्यांचा पक्ष श्रीलंकेत भारतविरोधी भावना भडकावण्यासाठी ओळखला जातो. अनुरा कुमारा दिसानायके यांना चीनच्या जवळचे मानले जाते. अभ्यासकांच्या मते दिसानायके श्रीलंकेच्या गादीवर बसणे भारतासाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहे. अनुरा कुमारा दिसानायकेच्या विजयाचा भारतावर काय परिणाम होईल? ते जाणून घेऊया.

अनुरा यांचे चीनवरील प्रेम जगजाहीर

अनुरा कुमारा दिसानायके यांची चीनशी असलेली जवळीक सर्वश्रुत आहे. AKD हे चीनच्या अगदी जवळचे मानले जातात. दिसानायकेचा विजय म्हणजे चीनसाठी आयती चालून आलेली संधी आहे. कारण चीन श्रीलंकेत आपले अस्तित्व वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. श्रीलंकेने याआधीच सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे हंबनटोटा बंदर 99 वर्षांच्या लीजवर बीजिंगला दिले आहे. अनुरा कुमारा दिसानायकेचा विजय हे नवी दिल्लीसाठी आव्हान असल्याचे मत श्रीलंकेवर दीर्घकाळ लक्ष ठेवून असलेल्या आर भगवान सिंग यांनी व्यक्त केले. कारण दिसानायके यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा नैसर्गिक मित्र स्पष्टपणे चीन असेल.

NPP party won the election
हृदयद्रावक! थाटामाटात लग्न लागलं, वरात निघाली; भीषण अपघातात नवरा-नवरीसह ७ जणांचा मृत्यू

भारतविरोधी आहे दिसानायके यांची भूमिका 

अनुरा कुमार दिसानायके यांचा इतिहास पाहता त्यांचा कल भारताकडे कमी आणि चीनकडे जास्त असेल हे समजू शकते. 1987 मध्ये भारतीय शांतता रक्षक दलाच्या विरोधात जेव्हीपीच्या बंडामुळे दिसानायके प्रसिद्ध झाले. त्या वेळी, भारतीय सैन्य श्रीलंकेत LTTE म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलमचा खात्मा करण्यासाठी उतरले होते. दिसानायके यांच्या पक्ष JVP ने 1987 च्या भारत-श्रीलंका कराराला विरोध केला होता, ज्यावर श्रीलंकेचे तत्कालीन अध्यक्ष जेआर जयवर्धने आणि भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वाक्षरी केली होती.

भारतासाठी श्रीलंकेचे महत्त्व तामिळनाडूच्या जवळ असल्यामुळे श्रीलंका भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील प्रांतांमध्ये तामिळ लोकांची लक्षणीय संख्या आहे, जी तेथील एकूण लोकसंख्येच्या 11 टक्के आहे. १३ वी घटनादुरुस्ती लागू करण्यासाठी भारत सरकार श्रीलंकेवर दबाव आणत आहे. ही दुरुस्ती तामिळींसोबत सत्तेच्या वाटणीबद्दलची आहे.

द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, श्रीलंकन ​​तमिळांना भीती आहे की दिसानायके 13वी घटनादुरुस्ती रद्द करू शकतात. भारत आणि श्रीलंका हे अनेक दशकांपासून एकमेकांचे मित्र आहेत. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारताने श्रीलंकेला 4 अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे. एवढेच नाही तर श्रीलंकेत अनेक रखडलेले भारतीय प्रकल्प पुन्हा सुरू झाले आहेत. तथापि, अनुरा कुमारा दिसानायकेसाठी भारताकडे दुर्लक्ष करणे इतके सोपे होणार नाही. दिसानायके यांच्या पक्षाची भारतविरोधी आणि चीन समर्थक भूमिका असली तरीही ते भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. यामुळेच काही काळापासून त्यांनी आपली भारतविरोधी गरळ ओकणेही कमी केले आहे.

Edited By - नितीश गाडगे

NPP party won the election
Viral Video: हे प्रभु ! एस्केलेटरवरून येण्याची नवीन पद्धत, VIDEO पाहून पोट धरून हसाल

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com