NCP On Corportion Election 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत फूट? आघाडी झाली तर ठीक आहे, अन्यथा.., राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक विधान

NCP On Corportion Election: भाजपनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील पुढील निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यानं महायुतीसंदर्भात मोठं विधान केलंय.

Bharat Jadhav

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती झाली तर ठीक नाहीतर स्वबळावर निवडणूक लढवू असा नारा राष्ट्रवादीचे नेत्याने दिलाय. मुश्रीफ यांच्या विधानामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीत फूट पडणार अशी चर्चा सुरू झालीय. दिलीप वळसे पाटील यांनी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या ‘नवसंकल्प च्या शिबिराआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याच्या विधानाने राजकारणात मोठी खळबळ उडून दिली आहे.

महाविकास आघाडीनंतर आता महायुतीतही बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीच्या नेत्यांनाही स्वबळाची भाषा सुरू केलीय. त्यामुळे भाजपसह शिवसेनेचं टेन्शन वाढलंय. आज शिर्डीत राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलं. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्ष स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. आगामी निवडणुकांसाठी पक्ष रणनीती ठरवत आहेत.

महायुतीचे मित्रपक्ष मोर्चेबांधणी करत असून पक्षांची शिबिरे घेत आहेत. भाजपनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेदेखील निवडणुकीसाठी तयारी सुरू केलीय. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये पक्ष शिबिरे आयोजित करण्यात आले आहे. या नव संकल्प शिबिरामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चिंतन केले जाणार आहे. तसेच पदाधिकारी व नेत्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे देखील शिर्डीमध्ये दाखल झालेत.

दिलीप वळसे पाटील यांनी शिबिरामध्ये सामील होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीसंदर्भात केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. “आज आणि उद्या होणाऱ्या या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आगामी निवडणुकीची रणनिती ठरवणार आहोत. सध्या ओबीसी आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे.

त्यामुळे या खटल्याच्या निकालानंतर निवडणुकीची प्रक्रिया आणि कसे लढायचे याबाबत निर्णय होणार असल्याचं वळसे पाटील म्हणालेत. याचवेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं. जर आघाडी झाली तर ठीक आहे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

महाविकास आघाडीदेखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरुन वाद निर्माण झालाय. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक या स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलंय. राऊतांनी स्वबळाबाबत विधान केल्याने मविआत फूट पडल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT