Saif ali khan: 'सेलिब्रिटी आणि सरपंच सुरक्षित नाहीत, तर...'; काँग्रेसचा महायुती सरकारला सणसणीत टोला

Nana Patole News: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही, असं मत अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय.
nana patole
nana patoleSaam Tv News
Published On

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सैफ अली खानवर झालेला भीषण हल्ला या घटनांवरून राज्य तापलंय. या घटनांवरून विरोधकांनी टीकेचे बाण सोडले. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलाय. मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलाय.

मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न उपस्थित करीत नाना पटोले यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी विविध मुद्दे मांडत सरकारवर निशाणा साधलाय.

राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेलीय. गुन्हेगारांना पोलिसांची भिती राहिलेली नाही. आमचे कुणी काहीही बिघडवू शकत नाही अशी मानसिकता गुन्हेगारांची झालीय, असं वक्तव्य नाना पटोले यांनी वाढलेल्या गुन्हेगारांच्या घटनांवरून केलंय.

nana patole
Amravati Crime: काळं फासलं, मिरचीची धुरी अन् नग्न अवस्थेत धिंड, जादुटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय महिलेसोबत अमानुष प्रकार

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू, या घटनाही जाती धर्माशी जोडून पाहणे चुकीचं आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

nana patole
Solapur-Pune Highway: सोलापूर-पुणे महामार्ग आता सहापदरी होणार, ३ उड्डाणपूल; सोलापूर-पुणे-सोलापूर प्रवास करा सुसाट!

राज्यातील कायदा सुव्यवस्थेला फक्त गृहमंत्रीच जबाबदार नाहीत, मंत्रिमंडळातच ६५ टक्के मंत्र्यांवर आरोप असतील तर, यापेक्षा वेगळे चित्र काय दिसणार आहे. पण ही परिस्थिती बदलावी लागणार आहे, असं नाना पटोले म्हणाले.

तसेच मराठा-ओबीसी वाद भाजपा युती सरकारनेच निर्माण केला आहे. त्यातून जनतेचे मुळ प्रश्न बाजूलाच पडले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झालाय, युवकांना बरोजगारीचा सामना करावा लागतोय, महागाई गगनाला भिडलीय, हे प्रश्न महत्वाचे आहेत. जाती धर्माच्या वादात न पडता सरकारविरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com