
विधानसभा निवडणुका होताच राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून या निवडणुकांसाठी तयारी करण्यात येत आहे. विधानसभेत पराभव झाल्यानंतर मविआने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवण्याचा निर्धार केला. पण मात्र महापालिकेच्या निवडणुकांआधी मविआत तणाव निर्माण झाला. याचदरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले. मात्र राऊतांच्या या नाऱ्याला पक्षातूनच विरोध होताना दिसत आहे.
अनेक ठिकाणी आघाडीचा पर्याय योग्य असल्याचे स्थानिक नेते म्हणत आहेत. इतकेच नाहीतर मुंबईपासून जवळ असलेल्या पुण्यातही तीच परिस्थिती आहे. पुण्यातील ठाकरे गट शिवसेनेतील लोकप्रतिनिधींना मात्र महाविकास आघाडी हवी. त्याबाबत ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आगामी निवडणुका आघाडीतून लढल्या पाहिजेत असं विधान केलंय. यामुळे पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांची संजय राऊत यांच्या विरोधात भूमिका? आहे का असा सवाल केला जात आहे.
पुणे महानगरपालिका महाविकास आघाडी म्हणूनच लढली पाहिजे, असं मोरे म्हणालेत. महाविकास आघाडी म्हणून लढलो तर पुणे महापालिकेत शिवसेनेला १०० टक्के फायदा होईल, विश्वास मोरे यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मविआ म्हणून एकत्र न लढता. वेगवेगळं लढावं, कार्यकर्त्यांना बळ द्यावं. पक्ष वाढवला पाहिजे, अशी भूमिका मांडता संजय राऊत यांनी एकला चलो रेचा नारा दिला.
तसेच चांदा ते बांदापर्यंत आपण आगामी स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं राऊत म्हणाले. राऊतांच्या या भूमिकेला पुण्यात विरोध होत आहेत. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वबळाच्या निर्णयाला विरोध केलाय.
संजय राऊत यांनी ज्यावेळी नारा दिला त्यावेळी पुण्यात नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत दोन मत प्रवाह होती. बैठकीत मी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढली पाहिजे, असं मत मी लोक प्रतिनिधी म्हणून मांडलं. त्यावेळी तेथे दोन मतप्रवाह होती. दरम्यान मतप्रवाह प्रत्येक पक्षात असतात. एक कार्यकर्त्यांचा असतो तर दुसरा लोकप्रतिनिधींचा असतो. कार्यकर्त्यांना वाटतं की, मला संधी मिळाली पाहिजे.
परंतु लोकप्रतिनिधींना वाटतं की, आपण सोबत राहून इतर लोकांची मदत आपल्याला मिळाली पाहिजे. ज्यावेळी आपण पुणे शहरात स्वतंत्र लढू म्हणजेच तीन मतांविरोधात आपण लढत असतो, त्यावेळी आपली ताकद कमी होत असते. त्यामुळे आपण मविआ म्हणून निवडणूक लढवली पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.