
मयूर राणे, साम प्रतिनिधी
राज्यातील गडकिल्ल्यांसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतलाय. अतिक्रमणामुळे गुदमणारे किल्ले आता मोकळा श्वास घेणार आहेत. राज्य सरकार गडकिल्ल्यांच्या सौंदर्याचे जतन करण्याचे काम करणार असून किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. तसेच पुढे भविष्यात अतिक्रमण होऊ नये,यासाठी सरदार दक्षता घेणार असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिलीय.
विशालगडावर झालेल्या अतिक्रमणानंतर गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विशालगडाप्रमाणे राज्यातील अनेक गड किल्ले देखील अतिक्रमित असल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारने त्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा असा मागणी केली जात होती. त्यापार्श्वभुमीवर आज सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत.
सरकारच्या निर्णयानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत याप्रकरणी माहिती दिली. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय ज्या विषयावर राज्यातील सामान्य नागरिकाची स्वाभाविक अपेक्षा त्याचा हा निर्णय महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाने घेतलाय. राज्यातील ४७ किल्ल्यांना केंद्र स्वरक्षित आहेत. तर राज्य सरकारच्या संरक्षित गडकिल्ल्यांची संख्या ६२ आहे. तर असंरक्षित किल्ल्यांची संख्या ३०० च्या दरम्यान आहे. या किल्ल्यांवरील सौंदर्य जतन करण्याचे काम केले जाईल, त्याअनुषंगाने निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी जिल्हाधिकाराच्या माध्यमातून समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील ४१० च्या पुढील गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण विरहित करण्यात येणार आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घेण्यात येणार आहे. अतिक्रमण हटवण्याबाबत अतिक्रमण ३१ जानेवारी ला रिपोर्ट देणार आणि १ फेब्रुवारीला सुरुवात करणार आहे. या सगळ्या किल्ल्यांवर काही ठिकाणी अतिक्रमण झाली आहेत. या गडकिल्ल्यांच्या सौंदर्याला इजा झाली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतलाय. या सगळ्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण करणं जबाबदारी आपली आहे.
किल्ल्यांवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी समिती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या समितीने सर्व केंद्र संरक्षित राज्य संरक्षित ४१० च्या वर या गडकिल्ल्यावरील अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करायचं आहे. या महिन्या अखेरपर्यंत शासन निर्णयानुसार प्रत्येक गड किल्लाचा आढावा घेण्यात येईल. त्याचा अहवाल राज्य सरकारकडे आहे. १ फेब्रुवारी ते ३१ मे दरम्यान धडक अतिक्रमण निर्मूलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली.
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात बोलताना शेलार म्हणाले, घटनेमुळे मुंबईतील सुरक्षेविषयी तशी वक्तव्य करणे स्वाभाविक आहे. पण आजही वर्तमान पत्रातील आकडे पाहता मुंबई शहर सुरक्षित आहे. मुंबई पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय आहे. जी घटना झालेली आहे त्यावर पोलीस चांगली कार्यवाई करतील. वांद्रे काल आणि आजही सुरक्षित आहे. मुंबई पोलीस बारीक नजर ठेवून काम करत आहेत. पोलीस वरिष्ठ डिपार्टमेंटशी त्याबाबत चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.