Saif Ali Khan Attack: हल्लेखोराचे २ व्हिडिओ अन् ढीगभर प्रश्न; सैफच्या बिल्डिंगमधील नव्या व्हिडिओंनी गूढ वाढवलं!

Saif Ali Khan Attacker Video : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील चाकू हल्ल्ल्याचा उद्देश काय होता याची उकल अजून झाली नाहीये. परंतु या हल्ला झाला त्या रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
Saif Ali Khan
Saif Ali Khan Attack videoSaam tv
Published On

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतले आहे. वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीच्या चौकशीतून हल्ल्याचा उद्देश काय होता हे समजेल. हल्लेखोर केवळ चोरीच्या उद्देशानेच घरात घुसला होता का सैफलाच टार्गेट करणार होता याचा तपास पोलीस करत आहेत. परंतु सैफवर हल्ला झाला त्या रात्रीचे काही सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहेत. त्यातून मात्र अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

रिपोर्टनुसार, सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर अनवाणी पायांनी घरात घुसला. त्यानंतर पळून जाताना तो बूट घालून बाहेर पडला. दरम्यान या घटनेशी संबंधित दोन व्हिडिओ समोर आलेत ज्यातून वेगवेगळ्या तर्क लावण्यासाठी वाट करून देत आहेत.

या तीन गोष्टींवर तपासाची सुई अडकली

हल्लेखोराच्या नवीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन गोष्टी दिसताहेत. यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई लटकलीय. पहिली गोष्ट म्हणजे सैफवर हल्ला करणारा अनवाणी पायांनी आला. तर पळून जातांना तो बूट घालून पायऱ्या उतरला.

Saif Ali Khan
Shahrukh Khan: बॉलिवूड हादरलं! सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोराने शाहरूख खानच्याही घराची केली रेकी

दुसरी गोष्ट म्हणजे हल्लेखोर जेव्हा सैफच्या घराकडे वर जात होता तेव्हा त्याची बॅग भरलेली दिसत आहे. तर धावत असताना त्याची बॅग रिकामी दिसत आहे. त्यात डोकं खाजवणारे तिसरी गोष्ट म्हणजे येताना हल्लेखोराने तोंड झाकले होते, तर पळून जाताना तो चेहरा न झाकता कॅमेऱ्यासमोर पळला. विशेष म्हणजे तो कॅमेऱ्याकडे पाहत आहे.

Saif Ali Khan
Saif Ali Khan Attack: रक्तबंबाळ, टी शर्ट माखलेला अन् इतक्यात...; सैफला मदत करणाऱ्या रिक्षाचालकानं सांगितला संपूर्ण थरार

याठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात आहे की, येताना त्याने चेहरा झाकला होता, तिथे सीसीटीव्ही लावले होते हे त्याला माहीत होते, त्यामुळे बाहेर पडताना त्याने तोंड का लपवले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामागे नेमकं काय तथ्य दडलंय ते पाहावं लागणार आहे. आता पोलीस तपास याच प्रश्नांभोवती फिरत आहे. सर्वांना जाणून घ्यायचे आहे की गुरुवारी रात्री सैफ अली खानच्या अपार्टमेंटमध्ये काय घडले?

Saif Ali Khan
Saif Ali Khan Attack: सैफ अली खान प्रकरणात नवा ट्विस्ट! प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक दावा

सैफ अली खानवरील हल्ल्यात वापरण्यात आलेल्या चाकूशी संबंधित मोठी बातमीही समोर आलीय. पोलिसांनी तपासात सैफच्या पाठीत अडकलेल्या चाकूचा समावेश केला आहे. हा अडीच इंचांपेक्षा जास्त लांबीचा चाकूचा तुकडा आहे. सैफ केवळ दोन मिमीने वाचला, अन्यथा हा चाकूचा तुकडा सैफच्या पाठीच्या कण्यामध्ये घुसला असता, असं डॉक्टरांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com