Maharashtra Politics : छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये अबोला कायम, २ तासातच अधिवेशनातून माघारी, शिर्डीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Political News : छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये अबोला कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ दोन तासानंतर अधिवेशानातून बाहेर पडले. शिर्डीत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
Chhagan bhujbal
Chhagan bhujbal Newssaam tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

शिर्डी : भाजपच्या अधिवेशनानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं शिर्डीत अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. या अधिवेशनाला मंत्री धनंजय मुंडे यांची गैरहजेरी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अवघ्या २ तासातच माघारी परतले आहेत. तसेच या अधिवेशनात छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये अबोला कायम असल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांच्या नाराजीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Chhagan bhujbal
Beed NCP News : सुरेश धस यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक; युतीधर्म पाळत नसल्याचे आरोप, मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार

शिर्डीत सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. मात्र, दोन दिवसांच्या अधिवेशनाला हजेरी लावून छगन भुजबळ माघारी निघाले आहेत. या अधिवेशनात अजित पवार यांच्याशी बोलणे झाले का, असा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ यांनी 'नाही' असे एका शब्दात उत्तर दिले. प्रफुल्ल पटेल दोन तास घरी येऊन बसले होते. तर सुनील तटकरे यांनी विनंती केली होती, त्यामुळे अधिवेशनाला आल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच त्यांनी आपली नाराजी कायम असल्याचे देहबोलीतून दाखवून दिले.

Chhagan bhujbal
Ajit Pawar : .. तर मी ब्लॅक लिस्ट करेल, अजित पवारांनी दिली ठेकेदारांना तंबी | Video

छगन भुजबळ यांनी काय सांगितलं?

अधिवेशनादरम्यान, छगन भुजबळ यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. 'मला ज्या वेळेला संधी मिळते, तेव्हा तेव्हा मी साईबाबांचं दर्शन घेत असतो. माझा मतदारसंघ येवला असून तिथून शिर्डीजवळ आहे, वेळ मिळाला की, मी शिर्डीला येतो. प्रफुल्ल पटेल यांनी माझ्याशी काल दोन तास चर्चा केली. माझी अधिवेशनाला हजेरी लागली आहे. राज्यात कितीही वादळे आली आणि शांत झाली, तरी समता परिषदचे काम सुरू असेल', असे भुजबळ यांनी सांगितले.

Chhagan bhujbal
Delhi Political News: बेरोजगारांना दरमहा ८,५०० रूपये मिळणार..निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिसरी गॅरंटी जाहीर

राज्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटावर जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, 'फुले शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक राज्यकर्ते आहेत. त्यांनी याबाबत लक्ष द्यायला पाहिजे. जसं की आपण शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आल्यावर जात धर्म विसरून दर्शन घेत असतो, त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारात आणि सरकारी व्यवहारात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com