Hake vs Jarange Patil  saam
महाराष्ट्र

Maharashtra Politics : लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले, मनोज जरांगेंना मदत करणाऱ्यांना पाडण्याचा निर्धार, १०० जागा लढणार!

Maharashtra Election : मनोज जरांगे यांना रसद पुरवणाऱ्यांना, पाठिंबा देणाऱ्यांना पाडण्याचा निर्धार लक्ष्मण हाके यांनी केलाय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनीही रणशिंग फुंकले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत (2024 Maharashtra Legislative Assembly election) लक्ष्मण हाके १०० जागांवर (laxman hake) उमेदवार देण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये बोलताना लक्ष्मण हाके यांनी घोषणाच करुन टाकली आहे. त्याशिवाय मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना रसद पुरवणाऱ्यांना आणि पाठिंबा देणाऱ्यांना पाडणार असल्याचा निर्धारही केलाय.

लक्ष्मण हाके यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले.

नागपूरमध्ये काय म्हणाले लक्ष्मण हाके ?

आम्ही काही लोकांची यादी तयार केली आहे, त्या मतदारसंघात काम करणार आहे. IT कंपन् सोबत बोललो असून 100 मतदारसंघातील लोकांची मते जाणून घेतली आहेत. आम्ही प्रॅक्टिकली विचार करतो, फक्त बोलत नाही. जातीनिहाय 100 लोकांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये सर्वपक्षीय लोक आहेत. ज्यांनी जरांगेंना रसद पुरविली, पाठिंबा दिला त्यांना पडणार आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

राहुल गांधींची वेळ मागितली -

आम्ही जनतेचा हिस्सा नाही का? बावनकुळे ओबीसी नेता म्हणून घेतात. obc आरक्षणाबद्दल ते बोलत नाहीत, त्यांना लोक दारात उभे का करणार? बुधवारी विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली, आम्हाला ज्यांची मदत लागेल त्यांची मदत घेऊ, राहुल गांधी obc साठी सकारात्मक असताना राज्यातील नेते थोरात, चव्हाण obc वर बोलत नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांची वेळ द्यावी, अशी विनंती वडेट्टीवार यांना केली, असे हाके म्हणाले.

ओबीसी समाजाची भीती वाटत नाही का?

आमदार-खासदार यांना मराठा समाजाची भीती वाटते, पण 50 टक्के obc समाजाची भीती वाटत नाही का? असा सवाल उपस्थित केला. संभाजीराजे यांच्या कार्यकर्त्यांवर वेळीच कारवाई झाली असती तर माझ्यावर पुण्यातील हल्ला झाला नसता, असेही ते म्हणाले.

रामदास आठवले कॅपेबल आहेत, पण नितीन गडकरी यांना सामाजिक न्यायमंत्री करून लाख दीड लाख कोटींचा बजेट करावं, गडकरी obc समाजाला न्याय देईल अस वाटतं, असा विश्वास यावेळी हाके यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT