Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसणार, माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

Maharashtra Political News : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील माजी आमदार भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे काँग्रेस पक्षाचे टेन्शन वाढले आहे.

Yash Shirke

Pune : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप भारतीय जनता पक्षात जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. सासवड आणि जेजुरी येथील काही माजी काँग्रेस नगरसेवकांनी जगताप यांची भेट घेतली आणि त्यांना भाजपमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्तेही भाजपमध्ये जाण्याचा विचार करत आहेत. पण यासंबंधित अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय जगताप यांचा शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्याकडून २४,१८८ मतांनी पराभव झाला होता. शिवतारे यांना १,२५,८१९ मते मिळाली होती, तर संजय जगताप यांना फक्त १,०१,६३१ मते मिळाली होती. राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार संभाजी झेंडे यांना ४७,१९६ मते मिळाली होती. संभाजी झेंडे हे संजय जगताप यांच्या पराभवाचे प्रमुख कारण होते असे म्हटले जात आहे.

एप्रिल २०२५ मध्ये भोर येथील माजी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये सामील झाले होते. पक्षाशी निष्ठा राखून काही मिळाले नाही, असे म्हणत थोपटे यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यांच्या पक्षांतर करण्याच्या निर्णयामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष सर्वांसमोर आला होता. भोर हा थोपटे कुटुंबाचा बालेकिल्ला होता.

संग्राम थोपटे पाठोपाठ कसबा पेठ येथील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही पक्षाची साथ सोडली. त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातून काँग्रेसचे नेते, पदाधिकारी पक्षातून बाहेर पडत आहेत. आता संजय जगताप हे देखील काँग्रेसमधून पक्षांतर करुन भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्रात काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat : आंबेनळी घाटात दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग बंद | VIDEO

Mumbai: १५० वर्षाचा कर्नाक पूल 'सिंदूर' ब्रिज का झाला? वाचा मुंबईकरांना फायदा काय होणार

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

Mobile Phone Mistake: रोजच्या मोबाईल वापरातील 'या' चुका टाळा, नाहीतर फोन लवकरच होईल खराब

Romantic Destinations : जोडीदारासोबतची सहल अविस्मरणीय बनवणारी ८ सुंदर पावसाळी ठिकाणं

SCROLL FOR NEXT