Former Congress MLA Rahul Bondre joins BJP: Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Former Congress MLA Rahul Bondre joins BJP: काँग्रेसच्या माजी आमदाराने पक्षाची साथ सोडली. राहुल बोंद्रे येत्या २२ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Priya More
  • भाजपकडून काँग्रेसला मोठा झटका

  • भाजपने काँग्रेसच्या माजी आमदाराला फोडलं

  • माजी आमदार राहुल बोंद्रे भाजपमध्ये जाणार

  • राहुल बोंद्रे २२ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार

  • राहुल बोंद्रे यांनी फेसबुकवर पोस्ट करत दिली माहिती

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने मोठी खेळी करत काँग्रेसला मोठा धक्का दिला. भाजपने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निकटवर्तीयाला फोडलं. काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसची साथ सोडली. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले काँग्रेसचे नेते राहुल बोंद्रे यांनी मोठा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या. अखेर त्यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. येत्या २२ सप्टेंबर रोजी राहुल बोंद्रे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

राहुल बोंद्रे यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी सांगितले की, 'मागच्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून मी राजकारण, सहकार, शिक्षण, बँकिंग आणि विविध क्षेत्राच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातल्या आपल्या सर्वांसोबत नाळ जुळवून आहे. चिखली मतदारसंघातील नागरिकांसोबत सातत्याने सोबत राहून सेवा करण्याचे काम केले. राजकारण मी आणि माझ्या परिवाराने व्यवसाय म्हणून कधीच पाहिले नाही. सेवा करण्याचे एक माध्यम असे आम्ही त्याकडे पाहिले. पैसा मिळवण्यासाठी नाही तर इतरांना मदत करून, त्यांच्या सुख-दुख:त सहभागी होऊन आनंद मिळवायचा उद्देश आम्ही सातत्याने ठेवले. माझ्या राजकीय वाटचालीत मी सातत्याने माझ्या पक्षासोबत प्रामाणिक राहिलो. जनतेसोबत देखील प्रामाणिक राहिलो. हीच माझी संपत्ती आहे.

राहुल बोंद्रे यांनी पुढे सांगितले की, 'तात्यासाहेब मला नेहमी सांगायचे की सत्तेमागे, पदामागे पळू नका या परिसराचे भवितव्य बदलणाऱ्या अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या संस्थांना मदत करा. पदं तुमच्यामागे आपोआप येतील. हाच विचार सोबत ठेवून माझा राजकीय आणि सामाजिक प्रवास सुरू ठेवला. माझ्या संपूर्ण प्रवासात तुम्ही मला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं. आमदार म्हणून २ वेळा निवडून दिलं. विधानसभेत पाठवले. माझ्या बोलण्यावरून तुम्ही अनेक निवडणुकीत पाठिंबा दिला. माझ्यासाठी तुमचा विश्वास महत्वाचा आहे. तुम्ही माझी जात, धर्म आणि पक्ष बघितला नाही. मला सातत्याने मतदान करत असताना तुम्ही या सर्व भिंती तोडून मतदान केले. तुमचा हा विश्वास माझ्यासाठी महत्वाचा आहे. एका कुटुंबातील सदस्यासारखं तुम्ही मला प्रेम दिले. तुमचे हे प्रेम आणि विश्वास मला कायम ठेवायचे आहे.'

तसंच, 'राजकीय आयुष्यात अनेक वेळा अशी वेळ येते की हा निर्णय घेणं खूप अवघड असते. अनेक आठवणी, नाती आणि संबंध असतात अशावेळी निर्णय घेणं अवघड होऊन बसते. एकीकडे हे सर्व पाहत निर्णय घ्यायचा आणि दुसरीकडे माझ्यासोबत असणारे यांचा देखील विचार करावा लागतो. हे अत्यंत अवघड असते पण अशाच एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन थांबलो आहे जिथून मला अवघड निर्णय घ्यावा लागत आहे. मी जो काही निर्णय घेतला आहे तो माझ्या स्वार्थासाठी नाही किंवा पदासााठी नाही तर माझ्यासोबत काम करणाऱ्या संघर्ष करणाऱ्या माझे सहकारी- कार्यकार्ते आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी आणि चिखलीच्या राजकारणाचे भविष्य ठरवण्यासाठी हा निर्णय आहे.' , असे राहुल बोंद्रे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT