BJP MLA: भाजप आमदार फेसबुक लाईव्हवरच ढसाढसा रडला; VIDEO प्रचंड व्हायरल, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

BJP MLA Video Viral: भाजप आमदाराचा एक व्हिडीओ सध्यो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार आणि त्यांची मुलगी ढसाढसा रडताना दिसत आहे.
BJP MLA: भाजप आमदार फेसबुक लाईव्हवरच ढसाढसा रडला; VIDEO प्रचंड व्हायरल, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
BJP MLA Video ViralSaam Tv
Published On
  • भाजप आमदाराच्या मुलीच्या लग्नात मोठी फसवणूक

  • भाजप आमदार ज्ञान तिवारी फेसबुक लाईव्हवर ढसाढसा रडले

  • ज्ञान तिवारी यांनी जावयावर केले गंभीर आरोप

  • २५ महिलांशी लग्न केल्याचा जावयावर आरोप

भाजपचे आमदार फेसबुकवर लाईव्ह येत ढसाढसा रडले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. घडलं असं की, भाजप आमदारासोबत भयंकर घडलं. आमदाराच्या मुलीचे लग्न ज्या तरुणासोबत झालं तो फसवा निघाला. या तरुणाने २५ तरुणींसोबत लग्न केलं असल्याचे उघड झाले. आपल्या मुलीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भाजप आमदाराला धक्का बसला. त्यामुळे त्याने मुलीसोबत फेसबुकवर लाईव्ह करत त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितले. या आमदाराने जावयाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातल्या सेउता मतदारसंघाचे आमदार ज्ञान तिवारी यांच्यासोबत ही भयंकर घटना घडली. आमदाराने मुलीसोबत फुसबुकवर लाईव्ह येत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आपले मेहुणे आणि जावई हे ठग असून त्यांनी अनेक विवाह जुळवून अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. आमदाराचा जावई असणारा अनुज त्रिवेदी हा मिसरीखमधील चंद्रावल गावचा रहिवासी आहे. त्याने टोपणनावे वापरून २५ तरुणींशी लग्न केले. पीडित महिला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. आरोपी अनुज तिवारीला फाशी झाली पाहिजे आणि माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करत आमदार आणि त्यांची मुलगी रडू लागले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्ञान तिवारी यांनी फेसबुक लाइव्हमध्ये सांगितले की, 'आज मी एक आमदार म्हणून नाही तर एक वडील म्हणून तुमच्याशी बोलत आहे. मी माझ्या मुलीचे लग्न २०२४ मध्ये केले होते. अनुज त्रिवेदीसोबत तिचे लग्न लावून दिले होते. या नात्याबद्दल त्यांना अनेक लोकांनी सांगितले होते. एमडी कॉलेजच्या प्राचार्यांसह अनेक लोकांशी सल्लामसलत करून हे नाते ठरवण्यात आले होते. माजी खासदार जनार्दन द्विवेदी यांचाही सल्ला घेण्यात आला होता. पण आज आम्हाला कळाले की आमची फसवणूक झाली आहे. माझ्या मुलीची फसवणूक झाली आहे. अनुज त्रिवेदीने वेगवेगळ्या नावांनी अनेक महिलांशी लग्न केले असल्याची आम्हाला कळाली.'

BJP MLA: भाजप आमदार फेसबुक लाईव्हवरच ढसाढसा रडला; VIDEO प्रचंड व्हायरल, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
Karnataka Vidhan Sabha Election Results: कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला नाकारलं; बेळगावात कोणी मारली बाजी?

भाजप आमदाराने सांगितले की, 'माझी फसवणूक झाली असून आता मी या प्रकरणात एफआयआर दाखल करणार आहे. माझी मुलगी डॉक्टर असून ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते.', असे सांगून त्यांनी आपल्या मुलीला कायम घरीच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. ज्ञान तिवारी यांनी सांगितले की, 'अनुजचा मुलगा प्रखर हा देखील या फसवणुकीत सामील असून तो अशाच प्रकारच्या कारवायांमध्ये गुंतलेला होता. अनुज त्रिवेदी यांच्यावर तीन ते चार गुन्हे दाखल असून अनेक लोकांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत.'

BJP MLA: भाजप आमदार फेसबुक लाईव्हवरच ढसाढसा रडला; VIDEO प्रचंड व्हायरल, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
BJP Rajesh Sawant : कोकणातील भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचं निधन, राजकारणावर शोककळा

त्यांनी पुढे असेही सांगितले की, 'माझी मुलगी स्वावलंबी आहे आणि मी तिला डॉक्टर बनवले आहे. ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. पण माझी फसवणूक झाली आहे. मी त्याच्याबद्दल माहितीसाठी अनेक लोकांना विचारले, पण कोणीही मला सत्य सांगितले नाही. माझे कुटुंब लहान आहे आणि आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणून मी हे केले. मला या माणसाबद्दल संपूर्ण माहिती नव्हती. आम्ही आमच्या मुलीलाही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तयार करत आहोत. माझा त्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. माझी मुलगीी स्वतः डॉक्टर आहे आणि स्वतःचा सांभाळ करू शकते. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ती माझ्या घरातच राहील मी हे वचन देतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com