Devendra Fadnavis vs Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: धुसफूस संपली! फडणवीस-शिंदे यांची महत्त्वाची बैठक, एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra municipal elections 2025 alliance updates : महायुतीतील धुसफूस संपली आहे. फडणवीस–शिंदे यांच्या महत्त्वाच्या बैठकीत मुंबई, ठाणे आणि राज्यातील सर्व महापालिका निवडणुका एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले. जागावाटप, पक्षांतर आणि रणनीतीवरही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

Namdeo Kumbhar

  • देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दीड तास बंद दाराआड चर्चा झाली.

  • आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय.

  • जागावाटप, नेते फोडण्यास बंदी यावरही चर्चा झाली.

  • महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता स्पष्ट.

Why Mahayuti decided to contest Maharashtra civic polls together : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सुरू असलेली धुसफूस, कुरघोडी अन् नेत्यांची पळवापळवी अखेर थांबणार आहे. राज्यात होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) एकत्र लढवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये सोमवारी उशीरा दीड तास बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीमध्ये महायुती एकत्र लढण्यावर एकमत झाल्याचे समजतेय. या बैठकीला प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.

सत्ताधारी महायुती मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. महायुती म्हणून एकत्रितपणे महापालिका निवडणुका लढण्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती एका खात्रीलायक सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत, प्रत्येक महानगरपालिकेच्या जागावाटप आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये चर्चा सुरू होईल, असेही सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, एकमेकांचे नेते, कार्यकर्ते फोडण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील अनेक नेते भाजपात दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या प्रकऱणावरही शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये बैठकीत चर्चा झाली. भाजप आणि शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, यावरही बैठकीत एकमत झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी रात्री बंद दाराआड चर्चा झाली. राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते. मुंबई आणि ठाण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे लढवण्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. भाजप आणि शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही यावरही एकमत झाले आहे.
शिवसेना, शिंदे गट

राज्यात होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. सत्ताधारी महायुती (भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना) सध्या राज्यात सत्तेत आहे. महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडूनही हालचाली होत आहे. काँग्रेस (INC), शिवसेना (UBT) (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) (शरद पवार गट) आणि मनसे यांच्याकडून जुळवाजुळव सुरू आहे. राज्यात काही दिवसांत महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्याआधी महायुतीची पुन्हा एकजूट झाली आहे. आता मविआमध्ये मनसेवरून खलबते सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Minister Gogawale Video: शिंदेसेनेच्या आमदारानंतर मंत्र्यावर कॅशबॉम्ब, दळवींनंतर गोगावलेंचा नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ

Maharashtra Politics: राजकारणातील अजून एक घर फुटणार? शिंदे गटातील माजी मंत्र्याच्या मुलाने धरली भाजपची वाट

Car Accident: भरधाव कारची उभ्या असलेल्या वॅगनआर कारला धडक, टक्कर होताच दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ५ जणांचा मृत्यू

विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा; शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप?

वैद्यकीय चाचणीत कॅन्सर झाल्याचं समजलं; कंपनीनं कर्मचाऱ्याला थेट कामावरुन काढलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT