Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Karuna Munde : धनंजय मुंडेंचे मुंबईत ३ फ्लॅट, पण मुक्काम मात्र सरकारी बंगल्यावर, करूणा मुंडे अन् अंजली दमानियांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : मुंबईत तीन फ्लॅट असूनही सरकारी बंगल्यात राहिल्याचा आरोप माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झाला आहे. पत्नी करुणा मुंडे व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ४६ लाख दंड व ४८ तासांत बंगला खाली करण्याची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत तीन फ्लॅट असूनही धनंजय मुंडे यांच्यावर सरकारी बंगला ताब्यात ठेवल्याचा आरोप.

  • करुणा मुंडे यांनी पतीला थेट आव्हान देत सरकारी बंगला सोडण्याची मागणी केली.

  • अंजली दमानिया यांनी सरकारला ४८ तासांची मुदत व ४६ लाख दंडाची मागणी.

  • ‘वीरभवन’ फ्लॅटच्या उघडकीमुळे प्रकरण आणखी गंभीर झाले असून राजकीय खळबळ उडाली.

Maharashtra Politics: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात सरकारी बंगल्याच्या गैरवापराचा आरोप दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. एका बाजूला त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी थेट वैयक्तिक आणि मालमत्तेशी संबंधित आरोप केले आहेत, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कायदेशीर पातळीवर त्यांच्याविरोधात आक्रमक मोहीम उघडली आहे.

करुणा मुंडे यांनी सार्वजनिकरित्या दावा केला आहे की, "धनंजय मुंडे यांच्या ताब्यात मुंबईत तीन फ्लॅट आहेत. एक मलबार हिल येथे, दुसरा पवईत आणि तिसरा सांताक्रुजमध्ये. जर तुमच्याकडे इतक्या ठिकाणी घरे आहेत, मग खोटं बोलून सरकारी बंगल्याचा लाभ का घेत आहात?" असा थेट सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “तुम्ही सांताक्रुजच्या घरात या आणि आपण पती-पत्नी म्हणून राहू. मी भाड्याने दुसरीकडे राहायला जाईन. ” करुणा मुंडे यांनी याच वक्तव्यात चेतावणी दिली की, "आता ना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, ना आमदारकी टिकेल."

दरम्यान, अंजली दमानिया यांनी या प्रकरणात कायदेशीर भूमिका घेत, सरकारला थेट ४८ तासांची मुदत दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, "धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदावर असताना सातपुडा बंगला मिळवण्यासाठी सरकारकडे सांगितले होते की त्यांचे मुंबईत घर नाही आणि तब्येतीच्या कारणास्तव तसेच मुलीच्या शिक्षणासाठी त्यांना येथे राहावे लागते. त्यावेळी देखील आम्ही सांगितले होते की त्यांनी घर भाड्याने घेऊन राहावे, पण आता परिस्थिती वेगळी आहे,” असे दमानिया म्हणाल्या.

दमानिया यांनी त्यांच्या वक्तव्यात एक गंभीर बाब उघड केली. "धनंजय मुंडे यांच्या २०२४ च्या हलफनाम्यानुसार, ‘वीरभवन’ नावाच्या इमारतीत ९०२ क्रमांकाचा फ्लॅट त्यांच्या ताब्यात आहे. हा फ्लॅट तब्बल २,१५१ स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचा असून अंदाजे चार बेडरूमचा आहे. जेव्हा एवढा मोठा खाजगी फ्लॅट आहे, तेव्हा मंत्री नसतानाही सरकारी बंगला ताब्यात ठेवणे हा कायद्याचा उघड उल्लंघन आहे,” असे त्यांनी सांगितले.

याचबरोबर, दमानिया यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, "सातपुडा बंगला तात्काळ रिकामा करून मुंडे यांना त्यांच्या स्वतःच्या घरी हलवण्यात यावे, तसेच सरकारी बंगल्याच्या वापरासाठी बाकी असलेला ४६ लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात यावा. जर ४८ तासांत कारवाई झाली नाही, तर आम्ही थेट न्यायालयात जाऊ,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, जनतेतही याबाबत तीव्र चर्चा सुरू आहे. एका बाजूला वैवाहिक वादातून उघड झालेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची प्रतिमा धक्का बसत आहे, तर दुसरीकडे कायदेशीर कारवाईची तलवारही त्यांच्या डोक्यावर लटकत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर हे आरोप सिद्ध झाले, तर आगामी निवडणुकांमध्ये मुंडे यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT