Karuna Munde: "मला जेलमध्ये टाकलं, वाल्मिक कराड घरी सोडवायला आला; करुणा मुंडे धायमोकलून रडल्या, VIDEO

Karuna Munde Breaks Down in Interview: करुणा मुंडे यांनी आज साम टीव्हीला मुलाखत दिली. मुलाखती दरम्यान करुणा मुंडे या ढसाढसा रडू लागल्या.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करून शर्मा यांनी केला होता . याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टात धाव घेत पोटगीला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती. आज याची केची अंतिम सुनावणी पार पडली. यावर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी हे लग्न अधिकृत नसल्याचा युक्तिवाद केला यानंतर लग्नाचे पुरावा देण्यासाठी करुणा शर्मा यांनी वेळ मागितले आहे.

या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी करुणा मुंडेंनी आज साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमाला मुलाखत दिली. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे हे अत्यंत खोटारडे व्यक्ती आहे. त्यांच्या सर्व कागदपत्रांवर पत्नी म्हणून माझे नाव आहेत. 2009 आणि 2014 च्या शपथ पत्रामध्ये देखील माझे नाव आहे. त्यांनी खूप काही लपवले आहेत.

आमचं मुलं बाळं देखील त्यांनी लपवले होते. असा धक्कादायक खुलासा करुणा मुंडे यांनी केला. काही लोकांच्या आशीर्वादामुळे आमचा नातं तुटले हे सर्व बोलताना करुणा मुंडे ढसाढसा रडू लागल्या. तसेच काही दलाल लोकांनी आमचं नाते तोडले आहे असं त्या म्हणाल्या. वाल्मीक कराड हा देखील धनंजय मुंडे यांचा दलाल होता नियतीने कोणाला सोडले नाही आणि त्यालाही सोडणार नाही. पण त्याच्यापेक्षा अनेक माेठ मोठे दलाल धनंजय मुंडेंचे आहे असा खळबळजनक खुलासा करुणा मुंडे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com