Anjali Damania: डबलपेंट’ कंपनी, शिक्षण संस्था, डान्स बार… अंजली दमानियांच्या निशान्यावर आता कोण? VIDEO

Anjali Damania Exposes Yogesh Kadam: कांदिवलीतील डान्स बार प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत सापडले आहेत. हेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत न्यायालयीन लढाईचा इशारा दिला आहे.

मुंबई येथील कांदिवली भागात शिवसेना शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा सावली डान्स बार प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच डान्सबारमधून काही महिला देखील ताब्यात घेण्यात आल्या होत्या. हा डान्सबार योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचे पोलीस तपासातून समोर आले होते. यानंतर एकच खळबळ उडाली. यावरच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आक्रमक झाल्या असून मी कायदेशीर लढाई लढणार असा इशारा त्यांनी दिलाय.

त्या म्हणाल्या, कुंडली आत्ताच्या घटकेला काढली आहे म्हणजे त्यांच्या जेवढ्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या जेवढ्या कंपनीज आहेत प्रत्येक कंपनीत योग,सिद्ध वगैरे नावाच्या ज्या अनेक डबलपेंट कंपनीज आहे. त्याचे सगळे डिटेल त्याचे जिथे जिथे प्रोजेक्ट चाललेत याव्यतिरिक्त शैक्षणिक संस्था ज्या त्यांच्या चालतात रत्नागिरीमध्ये त्याची सगळी माहिती काढली आहे. प्रचंड प्रमाणात माहिती आली आणि प्रचंड प्रमाणातला व्यवहार माझ्यापर्यंत आलाय आणि तो सगळा एकत्र करून मी न्यायालयीन लढाई त्यांच्याविरुद्ध लढणार आहे असे अंजली दमानिया म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com