Eknath Shinde and Congress leaders featured together on a viral election banner from Omerga, sparking intense political debate across Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधींचे फोटो

Unexpected Alliance Between Shinde Sena And Congress: उमरगा नगरपरिषदेत शिंदेसेना आणि काँग्रेसची अनपेक्षित युती जाहीर झाली असून या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. व्हायरल बॅनरमुळे चर्चांना वेग आला आहे.

Omkar Sonawane

  • उमरगा नगरपरिषदेत शिंदेसेना–काँग्रेस युतीमुळे राज्यात राजकीय खळबळ.

  • ठाकरे गटाकडून शिंदे यांच्यावर बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केल्याचा आरोप.

  • युतीचे उमेदवार किरण गायकवाड; प्रचार बॅनरवर शिंदे–गांधी तिकडीचे फोटो.

  • सोशल मीडियावर व्हायरल बॅनरमुळे राजकारणात चर्चांना उधाण.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारशिवमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून थेट एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि कॉँग्रेसची युती झाली आहे. राज्यात नगरपरिषद, नगरपंचयतीच्या निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. त्यातच आता उमरगा नगरपरिषदेत शिंदेसेना, कॉँग्रेस, रयत क्रांती संघटना, लहुजी शक्ति सेना यांच्या युतीने अनेकांच्या राजकीय भुवया उंचवल्या आहेत.

तसेच शिंदेसेना आणि कॉँग्रेसचा झेंडा सोबत फडकवला जात आहे. त्याशिवाय शिंदेसेनेचे आमदार गळ्यात कॉँग्रेसचा प्रचाराचा पट्टा घालून घरोघरी प्रचार करताना दिसत आहे.यावरच युतीवरून आता ठाकरे गटाने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत ट्विट केले आहे.

दानवे म्हणाले, की कॉँग्रेस नको म्हणून छाती बडवत सूरत गुवाहाटी असा पळपुटा प्रवास केला आणि नाकाने वांगे सोलले. आता घ्या. कटप्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी, राहुल गांधी एकाच बॅनरवर, ते ही धनुशाबाण चिन्हासह.. थोडक्यात दिल्लीश्वरांच्या भीतीने बाळसाहेबांचे विचार खुंटीला टांगले आहेत. यालाच म्हणतात बुडाखाली अंधार असा टोला अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

धाराशिवच्या उमरगा नगर परिषद निवडणुकीत शिंदेसेना आणि कॉँग्रेसची युती झाली आहे. या युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण गायकवाड हे आहेत. विशेष म्हणजे या युतीच्या बॅनरवर एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा फोटो पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियामध्ये हे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात उमरगा येथील कॉँग्रेस आणि शिंदेसेना युतीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavatar Narsimha: 'महावतार नरसिंह' ऑस्करच्या शर्यतीत; 'डेमन हंटर्स'सह 'या' पाच चित्रपटांना देणार टक्कर

पालिका निवडणुकीतही 50 खोके, भाजप आमदाराच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Live News Update: पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या

बायकोच्या बहिणीला लावली फूस; घरातील दागिने, पैसे घेऊन दाजीसोबत मेहुणी पळाली

Malaika Arora: मलायका अरोरा 33 वर्षाच्या हर्ष मेहताला करतेय डेट? एयरपोर्टवर दिसले एकत्र, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT