Devendra Fadnavis -Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा भाजपला दे धक्का, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Devendra Fadnavis -Eknath Shinde: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अकोल्यात मोठी राजकीय घडामोड घडली. एकनाथ शिंदेंनी भाजपला धक्का दिला. बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • अकोटमध्ये भाजपला मोठा धक्का

  • एकनाथ शिंदे यांनी दिला भाजपला धक्का

  • भाजपच्या युवती आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा चंचल पितांबरवाले यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

  • शेकडो कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत शिंदे गटात प्रवेश केला

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांमधील नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे जोरदार पक्षांतर सुरू आहेत. अशातच अकोल्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपच्या युवती आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा चंचल पितांबरवाले यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. चंचल पितांबरवाले यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं.

ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत मोठं इनकमिंग झालं. भाजपच्या युवती आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा चंचल पितांबरवाले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे अकोल्यात भाजपला खिंडार पडलं.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंचल पितांबरवाले यांच्यासह पक्षाच्या अनेकांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मनमानीला कंटाळत भाजपचा राजीनामा दिला होता. चंचल पितांबरवाले यांचं अकोटच्या राजकारण आणि समाजकारणात मोठं प्रस्थ आहे. त्यामुळे चंचल पितांबरवाले यांच्या प्रवेशाने शिंदेंच्या शिवसेनेला अकोल्यात मोठं बळ मिळण्याची शक्यता आहे. पण हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT