Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, सोलापुरातील राजकारणात उलाथपालथ

Solapur Politics: सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीलेखा पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. निवडणुकीपूर्वी स्थानिक राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Solapur Politics:
Congress leader Prakash Patil and wife Shrilakha Patil join BJP in Solapur during a mass joining event.saam tv
Published On
Summary
  • प्रकाश पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडली.

  • पक्षप्रवेश कार्यक्रमात राज्यातील अनेक मंत्री उपस्थित होते.

  • सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ

Summary

भारत नांगणे, साम प्रतिनिधी

सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सदस्या श्रीलेखा पाटील यांनी आज भाजपमध्य प्रवेश केला. माळशिरस तालुक्यातील पानीव येथील शेकडो कार्यकर्त्यांनीही त्यांच्या समवेत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रकाश पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Solapur Politics:
Maharashtra Politics: ठाकरे बंधूंना भाजपचा दे धक्का; दोन्ही पक्षांना पाडलं भलं मोठं खिंडार, ६००जणांचा पक्षप्रवेश

या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होते. काही दिवसापूर्वी प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीलेखा पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी भाजप राज्यातील कानाकोपऱ्यात आपली ताकद वाढवत आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत. भाजप आपली ताकद वढवण्यासाठी मित्र पक्षातील नेत्यांना गळ घातल आहे.

Solapur Politics:
Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

तर भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात "ऑपरेशन लोटस" राबवलंय. काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या गटातील माजी आमदारालाही आपल्या गटात ओढून आणलंय. आता या मोहिमेनं जोर धरला असून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश घडवून येत आहेत. अलिकडच्या काळात अनेक नेते, त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत. आता, आणखी दोन वरिष्ठ काँग्रेस नेते भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com