

ठाकरे गट आणि मनसेच्या संघटनांवर परिणाम होणार
इतर पक्षांकडून न्याय न मिळाल्याचा आरोप कामगार संघटनांनी केलाय.
आता आमच्या हक्कासाठी योग्य मंच मिळाला अशी प्रतिक्रिया कागमगारांनी दिली आहे.
संजय गडदे, साम प्रतिनिधी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाजपनं जबरदस्त शक्ति प्रदर्शन केलं. यावेळी भाजपनं ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिलाय. ठाकरे गटासह मनसेतील ५०० ते ६०० जणांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. इतर पक्षांकडून न्याय मिळाला नाही. भाजप कामगारांचा आवाज उठवेल, असा विश्वास व्यक्त करत ठाकरे गट आणि मनसेच्या संघटनांतील ६०० जणांनी कमळ हाती घेतलंय.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजप आणि महायुतीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. तर ठाकरे बंधूं राज आणि उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक अस्तित्त्व टिकवणारी असेल. या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकमूठ आवळलीय. दोन्ही बंधूंनी युती करण्याचे संकेत दिलेत. मुंबई आणि मुंबई उपनगरात ठाकरेंची ताकद आहे. एका वृत्तसंस्थेच्या सर्व्हेनुसार ठाकरे बंधू मुंबईत भाजपला धोबीपछाड देऊ शकतात, असा दावा केलाय. त्यामुळे ठाकरे बंधूंची ताकत कमकुवत करण्यासाठी भाजप कामाला लागलीय. त्याची सुरुवात त्यांनी कामगार संघटनांना सुरुंग लावून केली आहे.
आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामगारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. या भाजप प्रवेशामुळे ठाकरे गट आणि मनसेच्या संघटनांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजपने कामगार वर्गात पकड मजबूत केली असल्याचं म्हटलं जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या सर्वांनी पक्षप्रवेश केलाय. रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर ते पक्ष विस्ताराच्या कामाला लागलेत.
राज्यभरात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडवून आणत आहेत. आगामी काळात राज्यात स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणआर आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठ्या उलथापालथ होत आहेत, त्यात बहुतेक पक्षांमध्ये प्रवेशांचा धडाका लावलाय. यात भाजपची आघाडी आहे.
सातारा काय, पुणे काय अन् मुंबई काय सर्वत्र जोरदार इनकमिंग चालू आहे. आहिल्यानगरमध्ये शरद पवार गटाला दणका दिल्यानंतर आता भाजपने ठाकरे गटासह राज ठाकरेंना जबर धक्का दिला. भाजपने आता कामगार संघटनांवर लक्ष केंद्रीत केलंय.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठं शक्तिपदर्शन करत ठाकरे आणि मनसेचे कामगार पक्षातील कामगारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळातील कर्मचारी भाजप अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात सामील झालेत. विमानतळावरील विविध विभागातील कर्मचारी एकत्र आल्याने कामगार एकतेचा संदेश भाजपकडून देण्यात येत आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणारे कामगार ठाकरे गट आणि मनसेच्या पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत, त्यांच्या कार्यपद्धतीवर नाखूश असल्यानं त्यांनी भापजमध्ये प्रवेश केलाय.भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कार्यक्रस्थळी भाजपचा जयघोष करण्यात आला. आता आमच्या हक्कासाठी योग्य मंच मिळाला , अशा प्रतिक्रिया कामगारांनी दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.