Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Bacchu Kadu MahaElgar Morcha : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी मोर्चा काढलाय. मात्र यावरून प्रकाश आंबेडकर यांनी कडूंवर उपहासात्मक टीका केली आहे.
Bacchu Kadu MahaElgar Morcha
Bacchu Kadu leads MahaElgar Morcha in Nagpur; Prakash Ambedkar reacts with a sharp political remark.saam tv
Published On
Summary
  • शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी महाएल्गार मोर्चा काढला आहे.

  • प्रकाश आंबेडकर यांची कडूंवर खोचक टीका

  • मोर्चा नागपूरला दाखल झाला आहे.

वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी हा घणाघात केलाय. प्रहारच्या बच्चू कडूंवर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी महाएल्गार मोर्चा पुकरला. तब्बल 182 किलोमीटरचा प्रवास करून कडूंनी शेतकऱ्यांसह नागपूर गाठलं.

मात्र याचं मोर्चावरून आणि शेतकऱ्यांसाठीच्या मागण्यावरून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी कडूंना खोचक टोला लगावलाय. तर पंजाबमध्ये दुचाकीनं शेतकऱ्यांच्या मोर्चासाठी गेलो, असं म्हणत बच्चू कडूंनीही आंबेडकरांवर प्रहार केलाय.

Bacchu Kadu MahaElgar Morcha
Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या टीकेनं बच्चू कडूंचं आंदोलन खरचं शेतकऱ्यांसाठी आहे की आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी? असा सवाल निर्माण झालाय. त्यात शेतकरी नेते किशोर तिवारी यांनीही कडूंवर टीका केलीय. एकीकडे कडूंचं आंदोलन सुरु असताना शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारनं बैठक बोलावली. मात्र एकही शेतकरी बैठकीला हजर न राहिल्यानं ही बैठक रद्द केल्याचंही सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. तर आम्हाला अटक करण्यासाठी आज बैठक बोलवली का? असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केलाय.

Bacchu Kadu MahaElgar Morcha
Ladki Bahin Yojana: लाडकीची भरभराट, तिजोरीत खडखडाट, लाडकीसाठी वर्षाला 43 हजार कोटींचा खर्च

दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या टीकेनं बच्चू कडूंचं आंदोलन खरचं शेतकऱ्यांसाठी आहे की आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी? असा सवाल निर्माण झालाय. त्यात शेतकरी नेते किशोर तिवारी यांनीही कडूंवर टीका केलीय. एकीकडे कडूंचं आंदोलन सुरु असताना शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारनं बैठक बोलावली. मात्र एकही शेतकरी बैठकीला हजर न राहिल्यानं ही बैठक रद्द केल्याचंही सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. तर आम्हाला अटक करण्यासाठी आज बैठक बोलवली का? असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com